
थोडक्यात:
राजस्थानमध्ये ९ वर्षांच्या मुलीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
सर्दी-खोकल्यामुळे तिला हार्ट अटॅक आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्यासाठी काही ठराविक स्थिती कारणीभूत ठरू शकतात.
Can Cold and Cough Cause Heart Problems in Kids: सध्या लहान मुलांमध्ये देखील आपल्याला हार्ट अटॅकच्या घटना घडताना दिसत आहेत. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील ९ वर्षाच्या मुलीचा शाळेतच मधल्या सुट्टीत हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. परंतु एवढ्या लहान वयात अशा गंभीर आजाराने मृत्यू होण्यामागय नेमका काय कारण असू शकते हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
राजस्थानमधील इयत्ता चौथीमध्ये शिकणारी ९ वर्षाची प्राची कुमावत ही विद्यार्थिनी जेवणाचा डबा उघडताना अचानक चक्कर येऊन पडली. शिक्षकांनी तिला लगेच जवळच्या डॉक्टरांकडे नेलं. प्राथमिक उपचारांनंतर तिला रुग्णालायत दाखल करताना दुसऱ्यांदा हार्ट अटॅक आला आणि तिचा मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांनी ती काही दिवसांपासून सर्दी खोकल्याने त्रस्त असल्याचं सांगितलं. मात्र सामान्य वाटणाऱ्या सर्दी खोकल्याने इतकी गंभीर घटना घडू शकते का असा प्रश्न निर्माण होतो.
सामान्य वाटणारी सर्दी-खोकलाही काही वेळा गंभीर आजाराची सुरुवात असू शकते. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, शरीरात जर संसर्ग किंवा अॅलर्जीमुळे दीर्घकालीन जळजळ (क्रॉनिक इंफ्लामेशन) वाढली, तर ती हृदयावर ताण निर्माण करू शकते. त्यामुळे हृदय योग्य प्रकारे पंप न करता फुफ्फुसांमध्ये पाणी साचू शकतं आणि त्यामुळे खोकल्याचा त्रास वाढू शकतो. दीर्घकाळ अशी स्थिती राहिल्यास कोरोनरी आर्टरी डिसीजसारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात.
जन्मजात हृदयविकार (Congenital Heart Disease)
काही मुलांमध्ये हृदयाशी संबंधित दोष जन्मत:च असतात. याला जन्मजात हृदयविकार असं म्हणतात. अशा विकारांमध्ये हृदयाचे पडदे(flaps), रक्तवाहिन्यांची रचना किंवा हृदयाच्या पंपिंगमध्ये बिघाड असतो. उदाहरणार्थ, Anomalous Origin of the Left Coronary Artery ही एक गंभीर स्थिती आहे, जी हृदयविकाराचा धोका वाढवते.
नंतर तयार होणारे हृदयविकार (Acquired Heart Disease)
काही आजार जन्मानंतर विकसित होतात. यामध्ये रूमेटिक हार्ट डिसीज आणि कावासाकी डिसीज यांचा समावेश होतो. रूमेटिक फीव्हरमुळे हृदयाच्या पडद्यांवर परिणाम होतो. कावासाकी डिसीजमुळे शरीरात तीव्र जळजळ होते, जी हृदयावर परिणाम करू शकते.
छातीला झालेली इजा (Chest Trauma)
छातीला जोराची इजा किंवा अपघात झाल्यास हृदयाला नुकसान पोहोचू शकतं. अनेक संशोधनांनुसार, अशा प्रकारच्या इजेमुळेही मुलांमध्ये हार्ट अटॅक होण्याची शक्यता असते.
मुलाला दीर्घकाळ सर्दी, खोकला किंवा थकवा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मुलांना कोणत्याही प्रकारच्या छातीतल्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.
जन्मतः काही हृदयविकार असल्यास त्यावर योग्य उपचार सुरू ठेवावेत.
फिटनेस, आहार आणि नियमित आरोग्य तपासणी याकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक होऊ शकतो का? (Can children suffer from a heart attack?)
— होय, विशेषतः जन्मजात हृदयविकार, तीव्र जळजळ किंवा छातीला इजा झाल्यास अशी घटना घडू शकते.
सर्दी-खोकला हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं का? (Can cold and cough be a symptom of a heart condition?)
— काही वेळा दीर्घकालीन सर्दी-खोकला शरीरात सूज निर्माण करून हृदयावर ताण देऊ शकतो.
कावासाकी आणि रूमेटिक हार्ट डिसीज काय आहे? (What are Kawasaki and Rheumatic heart diseases?)
— हे मुलांमध्ये हृदयावर परिणाम करणारे विकार आहेत, जे संक्रमणामुळे जन्मानंतर विकसित होतात.
पालकांनी मुलांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी काय काळजी घ्यावी? (What precautions should parents take for children's heart health?)
— कोणतीही दीर्घ लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व नियमित आरोग्य तपासणी करावी.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.