

Silent Heart Attack in Women: No Chest Pain but Serious Risk
sakal
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत दीर्घकालीन आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. डायबिटीज, कॅन्सर, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे. यातही आजकाल तरुण तरुणींमध्ये हे आजार होण्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा खूप जास्त वाढलं आहे. अशीच एक घटना मध्यंतरी ]दिल्लीमध्ये घडली ज्यात एका ३६ वर्षांच्या महिलेला हार्ट अटॅक आला. यामागे एक महत्त्वाच कारण म्हणजे तिने काही सौम्य वाटणारी लक्षणं दुर्लक्षित केली.
याबद्दल डॉ. रहमान यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यात त्यांनी तरुण महिलांमध्ये दिसणाऱ्या एका अतिशय धोकादायक पण शांत पद्धतीच्या हार्ट अटॅककडे लक्ष वेधले आहे.