

Health Risks of Storing Hot Food in Aluminum Containers and Foil
sakal
Health Risks of Using Aluminum Containers for Hot Food: आजकाल प्रत्येक घरात उरलेले पराठे किंवा पोळ्या पॅक करून ठेवायला, नाहीतर भाजी काढून ठेवायला अॅल्युमिनियम फॉइलचा किंवा कंटेनरचा वापर करतात. मुलांच्या शाळेच्या आणि कॉलेजच्या डब्यात, ऑफिसला जाताना किंवा बाहेर कुठे फिरायला जाताना अन्न तसंच्या तसं गरम राहावं म्हणूनही याचा वापर जास्त होतो. पण ही सवय तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी किती सुरक्षित आहे, याचा कधी विचार केला आहे का?
तज्ज्ञांच्या मते, ही सवय दीर्घकाळात आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. याबद्दल झालेल्या संशोधनात काही बाबी स्पष्ट केल्या आहेत त्या जाणून घेऊया.