

8 Places Dirtier Than Toilets in Home
sakal
Health News in Marathi: आपण घरात राहतो, ते रोजच्या रोज झाडून, पुसून स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. टॉयलेट-बाथरूम साफ करणं तर दर आठवड्याच्या रविवारी फिक्स असतं. आणि प्रत्येक महिन्याला पंखा, फ्रिज, कपाट, सोफा वगैरेची देखील साफसफाई होते. पण तरीसुद्धा घरात अस्वच्छता, धूळ जाणवतेच किंवा घरातील कोणीतरी वारंवार आजारी पडतंच. मग एवढी साफसफाई करूनही असं का होतं असा प्रश्न अनेकांना पडलाच असेल. तर यामागे कारण बहुतेक वेळा घरातील अशा जागा असतात, जी रोज तर वापरली जातात पण स्वच्छ करताना सहज दुर्लक्षित होतात.
या जागा कायम घाण किंवा अस्वच्छ असतात कारण तिथे सतत हात लागतो आणि ओलावा राहतो. त्यामुळे इथे जंतू वेगाने वाढतात. त्यामुळे खाली दिलेल्या या ८ जागांची दररोज स्वच्छता करणं अतिशय गरजच आहे.