
कोरोनामुळे मुलांच्या विकासावर 'असा' होतोय परिणाम, पालकांनी काय करावे?
कोरोना महामारीच्या काळात लोकांना नाईलाजाने घरातच राहावे लागत आणि त्यांचे रोजचा वेगवेगळ्या लोकांसोबत होणार संवाद (social interactions) कमी झाला आहे. याचा परिणाम वेगवेगळ्या गटातील लोकांवर झालेला आहे, विशेषत: लहान मुलांवर. कोरोनामुळे मुलांना प्रत्याक्षात शाळेत जाण्याऐवजी ऑनलाईन क्लासेस करावे लागत आहे. मुलांना सध्या त्यांच्या मित्र-मैत्रिणी आणि इतर नातलगांपासून दुर रहावे लागत आहे. सहाजिकपणे, या सर्वाचा परिणाम त्यांच्या वागण्याबोलण्यावर आणि सामाजिक विकासावर (social development) होणार आहे.
तज्ज्ञांच्या मतानुसार, शिक्षणामध्ये ब्रेक घेतल्यास दिर्घकालीन आणि वाईट परिणाम होऊ शकतात. शाळेत सुरूवातीला काय शिकवले होते ते देखील बहूतेक मुलं विसरले असतील. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी दुर्गम भागातील आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुलांनासाठी अजूनही हा सहज उपलब्ध होणार आणि परवडणारा पर्याय नाही. घरातून शिक्षण घेण्यासाठी प्रत्येक मुलाला योग्य वातावरण उपलब्ध होऊ शकत नाही. अशा मुलांवर सर्वाधिक परिणाम होत असून त्यांची बौद्धिक विकास होत नाही.

हेही वाचा: बाळाच्या केसांची हळुवार काळजी कशी घ्याल?
अनेक अहवालांमध्ये कोरोना महामारीच्या काळात लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमधील सर्वात सामान्य मनोसामाजिक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या समोर आल्या आहेत.
दुर्लक्ष करणे (Inattention)
अवलंबून राहणे (Clinging)
लक्ष विचलित होणे ( Distraction)
महामारीबाबत प्रश्न विचारण्याची भीती वाटणे (Fear of asking questions about the pandemic)
आधीच मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्यांमध्ये हा बदल प्रामुख्याने दिसून आला.
समवयस्क मुलांसोबत खेळायला मिळत नसल्यामुळे, वर्गामध्ये होणारा संवाद कमी झाल्यामुळे मुलांचे सामाजिक संवाद कौशल्यावर (social skills)खूप परिणाम होत आहे. बालरोगतज्ञांना, मुलांना बोलण्यासाठी आणि भाषा शिकण्यासाठी वेळ लागत असल्याचे दिसून आले. भुतकाळातील क्लेशकारक घटना आणि असमान्य बालपणामुळे मुलांच्या वैयक्तिक विकासावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
“पालकांची नाराजी, वाद इत्यादींमुळे बर्याच मुलांना घरात योग्य वातावरण मिळत नाही. काम आणि कौटुंबिक दबावामुळे पालकांना मुलांसोबत जास्त वेळ घालवता येत नसल्याचेही दिसून येते. यातून, काहींना एकटेपणाची भावना निर्माण होते आणि महामारीच्या काळात नेमके हेच घडत आहे. फक्त एवढेच नाही तर कित्येक शाळांनी मुलांना अतिरिक्त गृहापाठाचा भार टाकला आहे आणि बराच काळ स्क्रिनवर बसल्यामुळे मुलांना कंटाळा येत आहे.

हेही वाचा: ओमिक्रॉनचा सामना करताना तुमच्या मुलांचे मानसिक आरोग्य कसे जपावं?
मुलांचा विकास होणार तरी कसा? आणि पालकांनी काय करायला हवे?
तुमच्या मुलांसोबत बोला आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त वेळ त्यांच्यसोबत घालविण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या चिंता समजून घेण्याचा प्रयत्न करा.
पालक आणि विश्वासू व्यक्ती म्हणून त्यांच्यासोबत राहा.
मुलांना गरज असेल तेव्हा त्यांना थोडी स्पेस द्या, विशेषत: किशोरीवयीन मुलांना.
मुलांना योग्य आहार घेऊन तंदुरुस्त राहण्यास मदत करा.
मुलांना व्यायामात गुंतवून ठेवा. कमी ते मध्यम तीव्रतेचे व्यायाम त्यांच्यसोबत एकत्र करा.
मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीचे स्वच्छतेचे नियम शिकवा, जे आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत, शाळा हळूहळू पुन्हा सुरू होत आहेत.
मुलांना मास्क कसा घालायचा ते दाखवा आणि त्यांच्यासाठी आरामदायक, फिट असे मास्क द्या.

Web Title: How Has The Pandemic Affected Your Childs Social Development Parenting Tips
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..