वयाच्या पन्नाशीनंतरही राहायचंय फिट तर फॉलो करा खिलाडी अक्षय कुमारचे हे 5 मूलमंत्र

Akshay Kumar Fitness Mantra : अभिनेता अक्षय कुमार फिटनेस फ्रीक आहे. वयाच्या पन्नाशीनंतर तुम्हाला फिट राहण्याची इच्छा असेल तर खिलाडीच्या फिटनेस टिप्स नक्की फॉलो करा.
Akshay Kumar Fitness Mantra
Akshay Kumar Fitness Mantrasakal
Updated on

Health Tips : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. अक्षयने स्वबळावर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अभिनयासोबतच खिलाडी आपले डेली रूटीन कसे सांभाळतो हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. प्रत्येकालाच त्याच्यासारखे फिटनेस कमावण्याची इच्छा असते.

55 वर्षांचा असूनही अक्षय कुमारच्या शरीरामध्ये इतकी एनर्जी कशी टिकून राहते? याचं उत्तर म्हणजे खिलाडी आपल्या फिटनेसकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही. फिटेनसशी संबंधित त्याचे पाच मूलमंत्र आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. हे मूलमंत्र फॉलो केले तर नक्कीच खिलाडीप्रमाणेच आपणही फिट राहू शकता. 

Akshay Kumar Fitness Mantra
Blood Test Tips : या 6 टेस्टमुळे अकाली मृत्यूपासून वाचू शकतो तुमचा जीव, कॅन्सर-हृदयविकाराचा टळू शकतो धोका

शिस्त

बहुतांश लोक फिटनेस रूटीनमधील शिस्तीच्या अभावामुळे आपले ध्येय गाठू शकत नाहीत. वर्कआऊट रूटीनमध्ये सातत्य टिकवणे, ही बाब मुळीच सोपी नाही. एक-दोन दिवस व्यायाम न होणे हे ठीक आहे. पण जर नियमित स्वरुपात व्यायाम करणे, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अतिशय गरजेचं असते. यासाठी शिस्त पाळणे महत्त्वाचे आहे.   

Akshay Kumar Fitness Mantra
Arthritis Symptoms: तुमच्याही हातापायांची बोटे वाकडी झालीयेत का? या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

हेल्दी लाइफस्टाइल  

पोषाखांपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत अक्षय कुमारच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्दी लाइफस्टाइल पाहायला मिळते. फिटनेसमध्ये नेहमीच टॉपला असणाऱ्या या अभिनेत्याचे त्याच्या सह-कलाकारांकडून कौतुक केले जाते. कित्येक तास शूटिंग केल्यानंतरही खिलाडीमध्ये मैलोनमैल पळण्याची ऊर्जा असते, असे त्याच्या को-स्टार्सचं म्हणणे आहे. 

क्षणभर विश्रांती 

फिटनेस प्रेमींकडून बहुतांश वेळेस होणारी मोठी चूक म्हणजे विश्रांती न घेता व्यायाम करणे. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या स्नायूंमध्ये सूक्ष्म स्वरुपात भेगा तयार होतात, त्यामुळे शरीराचे स्नायू मजबूत करणं गरजेचं असते.

Akshay Kumar Fitness Mantra
नॅचरल पेन किलर आहे हे फळ, निरोगी आरोग्यासाठी आजीच्या बटव्यातील रामबाण उपाय

व्यायामादरम्यान शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी विश्रांती घेणे, पुरेशा प्रमाणात झोपणे अतिशय गरजेचं आहे. खिलाडी अक्षय कुमार देखील पहाटे 5 वाजता उठतो आणि सूर्यास्तापूर्वी भोजन करतो व रात्री 9 वाजेपर्यंत झोपी जातो. 

टॉक्सिन फ्री लाइफस्टाइल

वयाच्या 55 व्या वर्षी फिट राहता यावे, यासाठी अक्षय कुमार टॉक्सिन फ्री लाइफस्टाइलच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करतो. यासाठी तो मद्य, सिगारेट, कॅफिनयुक्त पेय अशा हानिकारक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवतो.   

सर्व पौष्टिक पदार्थांचे सेवन करा  

फिटनेस प्रेमींसाठी दिवसाचा डाएट चार्ट ठरलेला असतो. वेगवेगळ्या डाएट प्रकारांमुळे बहुतांश लोक आहारामध्ये काही निवडक खाद्यपदार्थांचाच समावेश करतात. पण अक्षय आपल्या डाएटमध्ये फॅट्स, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनयुक्त सर्व पदार्थांचा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार समावेश करतो. पौष्टिक खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्यास ते केळीसारख्या फळांचे सेवन करतो. संध्याकाळी  6:30 वाजेपर्यंत तो रात्रीचे जेवण जेवून घेतो.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com