खाणारे तुम्ही ; पचवणार कोण?

आधुनिक राहणीमान, रासायनिक अन्नपदार्थ, चुकीच्या स्वयंपाकपद्धती आणि मानसिक ताणतणावामुळे वाढलेला गॅस व अपचनाचा त्रास; खाण्यापेक्षा पचवण्याची शक्ती महत्त्वाची
Experts say that digestive health depends not only on food quality but also on lifestyle, cooking methods, eating habits and emotional balance.

Experts say that digestive health depends not only on food quality but also on lifestyle, cooking methods, eating habits and emotional balance.

Sakal

Updated on

लहान मुलांनाच नाही तर सर्वांनाच फुगे आवडतात आणि गॅस भरलेला फुगा तर सर्वांनाच खास आकर्षण! पण गॅस भरून पोटाचा फुगा किंवा नगारा झालेला कोणालाच आवडत नाही. या गॅसमुळे प्रत्यक्ष शरीर जरी वर उचलले गेले नाही तरी एक ना एक दिवस जीव वर स्वर्गात अवश्‍य जातो. गॅसच्या प्रेशरमुळे कासावीस झालेली, डोळे फिरवलेली माणसे मी पाहिली आहेत. खूप गॅस असल्यानंतर छातीत दुखते, पण म्हणून खरोखर हृदयरोगामुळे छातीत दुखले तरी काय ‘साधा गॅस तर आहे’ असे म्हणत राहण्याने भलत्याच प्रसंगाला तोंड द्यावे लागते. पोटात गॅसचा गुबारा धरणे ह्याचे जेवढे संकट आहे, त्यापेक्षा मोठ्या संकटास आणि लाजिरवाण्या परिस्थितीस तो गॅस बाहेर जाताना तोंड द्यावे लागते. अर्थात ही अपान क्रिया अधोगामी झाली तर त्यातल्या त्यात बरे पण ऊर्ध्वगामी झाल्यास हृदयाचे, डोळ्यांचे व मेंदूचे बरेच नुकसान होते. सरणाऱ्या अपान वायूस प्रत्येक वेळी दुर्गंध असतोच असे नाही. शरीरात साठलेला आमदोष किंवा कडक झालेल्या स्नायूवर दाब दिल्यावर चलित झालेला वायुसुद्धा अपानमार्गे किंवा ढेकर येऊन बाहेर जातो. पोटात वायू धरण्याची अनेक कारणे असू शकतील, पण वातूळ पदार्थ खाण्याने वायूचा त्रास नक्कीच होतो. पावटा, वाटाणा, वांगी अशा काही वातूळ पदार्थांचा अनुभव सर्वांनाच असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com