

Chemotherapy Diet Plan: केमोथेरपी ही कर्करोगाच्या उपचारांवर सर्वात प्रभावी मार्ग आहे. पण, त्यात अनेक समस्या आणि आव्हानेही येतात. केमोथेरपीचेही अनेक दुष्परिणाम आहेत आणि अशीच एक समस्या म्हणजे शरीरात पोषणाचा अभाव. केमोथेरपीनंतर, रुग्णांच्या चव, भूक आणि खाण्यापिण्याशी संबंधित आवडी-निवडीत बदल होतात. अनेक वेळा कॅन्सरच्या रुग्णांना जेवण करावेसे वाटत नाही. अशावेळी त्यांना पुरेसे पोषण मिळत नाही. उपचारानंतर, शरीराला ताकद मिळण्यासाठी, जलद पुनर्प्राप्ती आणि ऊर्जा पातळी राखण्यासाठी पोषण आहार महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पोषण तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांच्या मते कोणता आहार घ्यावा हे जाणून घेऊया.