काळजी नवजात आईची..

स्त्री नुकतीच प्रसूत झालेली असते हा काळ आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा
how to take care new born baby and woman transformed into mother
how to take care new born baby and woman transformed into mother sakal
Summary

स्त्री नुकतीच प्रसूत झालेली असते हा काळ आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा

- डॉ. मालविका तांबे

घरी बाळ जन्माला आले की घरातील प्रत्येक जण अगदी आनंदी असतो. बाळ कोणावर गेले आहे, त्याची काळजी कशी घ्यावी, त्याचे केस कसे आहेत वगैरें विषयांवर चर्चा करत असताना गेले नऊ महीने आईवर असलेला फोकस पूर्णपणे बाळाकडे गेलेला दिसतो. बालक नवजात असते तसे खरे तर आईही नवजातच असते. स्त्री आईच्या रूपाला बदललेली असते.

तिची पहिली कितीही बाळंतपणं झालेली असली तरी प्रत्येक गरोदरपण व प्रत्येक बाळंतपण वेगळे असते हे विसरून चालणारनाही. स्त्री नुकतीच प्रसूत झालेली असते हा काळ आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा असतो असे सांगितलेले आहे. पूर्वीच्या काळात ७-८ मुले झाल्यावरही स्त्री कणखरपणे उभी असायची, तिची कंबर दुखत नसे, तिची ताकद कमी झालेली नसे, तिचा उत्साह टिकून राहिलेला असे, अजून चार बाळं झाली तरी त्यांना आनंदाने सांभाळीन अशी शांतपणे सांगत असे.

पूर्वीच्या काळी सूतिका परिचर्येचे पालन व्यवस्थितपणे केले जात असे त्यामुळे कदाचित त्यांचे स्वास्थ्य व्यवस्थित रहात असावे. सध्या मात्र एका बाळंतपणानंतर दुसऱ्या बाळंतपणाचा विषय काढला तर ‘एक बाळंतपण झाले तेच खूप आहे, परत त्याच अनुभवातून जायची माझी इच्छा नाही’ असे शब्द ऐकू येतात. एकाच बाळंतपणाने तिचे संपूर्ण शरीर आमूलाग्र बदलून टाकलेले असते.

श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे स्त्रियांच्या स्वास्थ्याकरता समाजात जागरूकता आणण्याचा प्रयत्न आयुष्यभर करत होते. ते नेहमी म्हणत असत, ‘स्त्रीस्वास्थ्य व्यवस्थित टिकून राहिले तर सगळे कुटुंब व्यवस्थित राहू शकते’. आयुर्वेदीय गर्भसंस्कार व गर्भधारणा या संकल्पनेतून बऱ्याच गोष्टी त्यांनी समाजासमोर आणल्या.

संतुलन आयुर्वेद फर्टिलिटी एक्पिरिअन्स म्हणजे स्त्री, पुरुष व कुटुंबाकरता नैसर्गिक व आयुर्वेदिक रित्या कशी गर्भधारणा होऊ शकेल, गर्भारपणात कशी काळजी घेता येईल व बाळंतपणात नवजात बालकाची व आईची काळजी कशी घेता येईल या सगळ्यांबद्दल त्यांना मार्गदर्शन केले. संतुलन आयुर्वेद फर्टिलिटी एक्पिरिअन्स द्वारे गर्भधारणा झालेल्या बहुतांशी स्त्रिया दुसरे बाळ आवर्जून हवे आहे असे सांगतात.

‘‘तस्यास्तु खलु यो व्याधिरुत्पद्यते स कृच्छसाध्यो भवति असाध्यो वा, गर्भवृद्धिक्षयितशिथिलसर्वधातुत्वात्‌, प्रवाहण वेदनाक्लेदनरक्तनिःस्रुतिविशेषशून्य शरीरत्वाच्च, तस्मात्तां यथोक्तेन विधिनोपचरेत्‌ ॥ ...चरक शारीरस्थान.’’ आयुर्वेदामध्ये नुकत्याच जन्म दिलेल्या आईला सूतिका असे म्हणतात, तिच्यावर केल्याजाणाऱ्या उपचारांना सूतिका परिचर्या म्हटले जाते. बालकाला जन्म दिल्यानंतर स्त्री नाजूक व संवेदनशील अवस्थेत असते.

तिने नऊ महिने गर्भाचे पोषण केलेले असते, त्याला आपल्या गर्भाशयात वाढवलेले असते, आपली संपूर्ण ऊर्जा बाळावर केंद्रित केलेली असते, बाळाला जन्म देण्याकरता कळा तरी सोसलेल्या असतात किंवा शरीरावर घाव तरी घेतलेले असतात. या सगळ्या प्रक्रियेत तिच्या शरीरातून भरपूर प्रमाणात रक्त गेलेले असते.

साहजिकच तिच्या शरीरात कुठल्याही प्रकारची शक्ती किंवा प्रतिकारशक्ती उरलेली नसते. या काळात काळजी घेतली गेली नाही तर तिला निरनिराळे आजार होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या परिचर्येची गरज आहे की तिच्या शरीरातील ताकद भरून यायला व तिचे संरक्षण व्हायला मदत मिळू शकेल. बाळंतपणानंतरचे पहिले दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. बाळाच्या झोपायच्या वेळा, त्याच्या स्तन्यपानाच्याच्या वेळा, त्याची शी-शू या सगळ्यांबरोबर तिला जमवून घ्यायला लागते.

त्याच बरोबरीने या काळात गर्भाशयाची शुद्धी सुरू झालेले असते, योनीमार्गे रक्तस्राव होत असतो. प्रसूती होत असताना टाके घेतले गेले असले तर या काळात सॅनिटरी पॅड वगैरे लावताना खूपच त्रास होताना दिसतो. बाळाला स्तन्यपान करविण्याच्या दृष्टीने तिला सतत बसूनही राहावे लागते. तर बघू या या पहिल्या दिवसांत आईची काळजी कशी घ्यायची असते.

प्रसूतीनंतर स्त्रीच्या संपूर्ण अंगाला अभ्यंग संतुलन अभ्यंग सेससी सिद्ध तेलासारखे वातशामक तेल लावावे. विशेषकरून पोट, पाठ व छातीवर तेल नक्की लावावे. प्रसूती रात्री झाली असल्यास पोट व पाठीवर तरी नक्की तेल लावावे. दुसऱ्या दिवशी सकाळपासून संपूर्ण अंगाला तेल लावणे सुरू करावे. हे तेल कोमट केलेले असले तर अधिक चांगले. तेल हलक्या हाताने खालून वर व पोटावर गोलाकार दिशेत लावावे. सिझर झाले असेल तर पोटावर तेल लावणे टाळावे पण इतर जागी तेल लावता येते.

प्रसूती झाल्यानंतर स्त्रीला ताकद वाटत असेल तर स्नान करायलाही हरकत नसते. कोमट पाण्याने अंघोळ करणे उत्तम. शक्य झाल्यास अंघोळीपूर्वी संतुलन अभ्यंग मसाज पावडर दुधात वा पाण्यात कालवून पूर्ण अंगाला लावणे अत्यंत उत्तम. हे शक्य नसेल तर जेथे जेथे स्ट्रेच मार्क येण्याची शक्यता असते तेथे असे उटणे नक्की लावावे.

अंघोळ करून झाल्यावर तिने थोडा वेळ आराम करणे उत्तम. त्यानंतर संतुलन शक्ती धुपासारख्या धुपाने योनाभागी धूपन करावे. यावेळी योनीभागाची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक असते. कुठल्याही संक्रमणापासून भांडायला अशा प्रकारचे धूपन करण्याचा फायदा मिळतो. अंघोळीनंतर व संध्याकाळी असे धूपन करणे स्त्रीच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते.

योनीतून रक्तस्राव होत असताना धूपन कसे करावे हा प्रश्र्न अनेकांना पडतो. पण अशा रक्तस्राव होत असतानाही धूप घेणे चालू शकते. उलट धूपनासाठी पहिले दहा दिवस जास्तीच महत्त्वाचे असतात. योनीधूपन झाल्यावर संपूर्ण अंगाला धूपन करणे तसेच शेक घेणे आवश्यक असते. बाळंतपणामध्ये वातदोष खूप प्रमाणात असंतुलित झालेला असतो, तसेच तिचे हॉर्मोन्सही खूप प्रमाणात बदललेले असतात. अभ्यंगानंतर धूप व शेकण्याने या सगळ्यांवर नियंत्रण मिळते. खाटेवर स्त्रीने झोपून धूप व शेक घेणे चांगले. धूप करताना त्यात बाळंतशोपा, ओवा, वावडिंग टाकू शकतो.

शरीराच्या सगळ्या अवयवांना असा धूप काही सेकंदांसाठी द्यावा. नंतर कोळशाचा शेक किंवा शक्य नसल्यास गरम पाण्याच्या पिशवीने वा हॉट पॅड वगैरेंच्या मदतीने कंबरेला व मानेला नक्की शेक द्यावा. गरमीच्या दिवसात प्रसूती झाली असल्यास स्त्रिया असा शेक घेणे टाळतात, परंतु खरे तर २-५ मिनिटे अशा शेक घेतला तर कंबर दुखणे वगैरे त्रास कमी होतात.

प्रत्येक स्त्रीची उष्णता सहन करण्याची क्षमता वेगळी असते. त्यामुळे जमेत तितका वेळ १-२ मिनिटे आपल्या सहनशक्तीनुसार शेक घ्यावा. हे सगळे करणे जमत नसले तर निदान खोली नक्की ऊबदार ठेवावी. खोलीत मिनिटे हीटर लावून ठेवल्यास कमीत कमी अंघोळीनंतर एकदम गार तापमानाच्या संपर्कात आल्यावर होऊ शकणाऱ्या त्रासांपासून प्रतिबंध होण्यास मदत मिळू शकेल.

वातशमनाच्या दृष्टाने कानाला स्कार्फ बांधणे, कानात बोळे ठेवणे चांगले. पोटाला सुती कापडाचा किंवा बाजारात मिळणार तयार पोटपट्टा बांधलेला चांगला. सिझर झाले असल्यास ८-१० दिवसांनंतर असा पट्टा बांधू शकता. पोटपट्टा किती घट्ट बांधावा हे प्रत्येकाच्या सोयीनुसार ठरवता येते, पण पट्टा जमेल तेवढा घट्ट बांधावा.

स्त्रीने या काळात आराम करणे आवश्यक असते. बाळ झोपले असता तिने झोपणे किंवा बाळ जागे असताना व्यवस्थित आधार घेऊन तिने बाळाला पाजणे गरजेचे असते. चुकीच्या पोश्चरमध्ये बाळाला दूध पाजल्यास बाळाला त्रास होतो तसेच आईलाही त्रास होण्याची शक्यता असते.

या दहा दिवसांत बाहेरच्या अनेक लोकांना येणे-जाणे टाळणे बरे. अशा दोन व्यक्ती नेमाव्या ज्या बाळंतिणीबरोबर रात्र-दिवस मदतीला राहू शकतील. अनेकांनी बाळंतिणीच्या खोलीत येणे तसेच बाळाला हाताळणे टाळलेलेच बरे.

बाळंतिणीला खाण्या-पिण्याची फार काळजी घेणे आवश्यक नसते असे सध्या सांगण्यात येते. त्यामुळे स्त्रियांचे आरोग्य फार प्रमाणात खराब होताना दिसते. आहाराची काळजी घेणे हे आई व बाळ अशा दोघांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. शक्य असल्यास आहार पातळ वा द्रव स्वरूपात असावा. कोरडे अन्न, जास्त प्रमाणात सॅलड आई व बाळ दोघांसाठी चांगले नसते.

रसरसशीत पदार्थ शरीरात रसधातू वाढवून स्तन्य व्यवस्थित तयार करायला मदत करतात. शक्य झाल्यास सकाळ-दुपार-संध्याकाळ संतुलन शतावरी कल्प घालून दूध, अहळिवाची खीर आवर्जून घ्यावी. त्याचबरोबरीने सॅन रोझ, धात्री रसायन, संतुलन लोहित प्लस, संतुलन पित्तशांती वगैरे घेणे चांगले. न्याहारीमध्ये ताजा तयार केलेला दशमूळ काढाही घेणे उत्तम.

सकाळच्या न्याहारीच्या वेळी किंवा दुपारच्या चहाच्या वेळी डिंकाचा लाडू, मेथीचा लाडू खाणे चांगले ठरते. जेवणात गार अन्न, शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ टाळावेत. चणा, वाटाणा वगैरे वातूळ पदार्थ कमीत कमी तीन महिने आहारातून वर्ज्य करावेत. वातशमनाच्या दृष्टीने संतुलनचे बाळंत काढेही घेणे उत्तम.

‘आम्ही बोअर झालो’ या नावाखाली सध्या स्त्रिया पहिल्या १०-१५ दिवसांतच बाळाला घेऊन फिरायला निघतात. हे दोघांच्या आरोग्याकरता चांगले नसते. खरे तर पहिले दहा, दिवस पुढचा सव्वा महिना, तीन महिने, सहा महिन्यांपर्यंत घ्यायची असते. सहा महिन्यांनंतर हळू हळू स्त्री तिच्या पहिल्यासारखी वागणूक ठेवू शकते. अशा प्रकारचे पालन केल्याने स्त्री पूर्ववत स्थितीत जायला मदत होते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.

या नव्हे तर इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला संतुलन आयुर्वेद फर्टिलिटी एक्पिरिअन्समधून माहिती मिळू शकते. याच्या मार्गदर्शनाचा आत्तापर्यंत लाखोंनी फायदा घेतलेला आहे. बाळ हवे असले किंवा स्त्री व बाळ यांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यायची असली तर संतुलन आयुर्वेद फर्टिलिटी एक्पिरिअन्स अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com