

"पाठदुखीने बेजार आहात? आधी वजन काट्यावर उभं राहा!" कण्याचं आरोग्य जपण्यासाठी डॉ. अजय कोठारी यांचा मास्टर प्लॅन.
Sakal
डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन
‘‘वजन थोडं वाढलंय, पण पाठदुखीचा त्याच्याशी काय संबंध?’’ असा प्रश्न अनेक रुग्ण विचारतात. प्रत्यक्षात शरीराचं वजन आणि कण्याचं आरोग्य यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. प्रत्येक अतिरिक्त किलो वजन म्हणजे कंबरेवर आणि गुडघ्यांवर सतत पडणारा वाढीव ताण. हा ताण काही दिवसांत जाणवत नाही; पण महिनोन्महिने, वर्षानुवर्षं टिकला की पाठदुखी, स्लिप डिस्क आणि सांध्यांच्या झिजेचं प्रमाण वाढतं. वजन नियंत्रण हा केवळ दिसण्याचा विषय नसून कण्याचं संरक्षण करण्याचा मूलभूत उपाय आहे.