

Human Consciousness and Spiritual Growth Discover How Awareness and Positive Thinking Can Transform Everyday Life
sakal
सद्गुरू, ईशा फाउंडेशन
जेव्हा जगण्याची धडपड हाच जीवनाचा मुख्य भाग असतो, तेव्हा जीवनाला एक केंद्रबिंदू असतो. एकदा जगण्याची सोय झाली आणि सुखसोयी आल्या, की स्वतःच्या अंतरंगात काहीतरी अधिक सखोल गवसल्याशिवाय माणूस जीवनाचा केंद्रबिंदू हरवून बसतो; आज नेमके तेच घडत आहे. भारतात समाजाचा मोठा वर्ग अजूनही जगण्यासाठी धडपडत आहे; पण पाश्चात्त्य समाजांकडे पाहिले, तर भौतिकदृष्ट्या कोणत्याही माणसाचे स्वप्न असू शकेल ते सारे, जवळजवळ प्रत्येकाकडे आहे. तरीही माणूस हळूहळू मानसिक असंतुलनाच्या टोकाकडे वाटचाल करत आहे. मानवतेला याचा सामना करावाच लागेल.