Human Psychology : इतरांचा विचार करणारेच नेहमी त्रास का सहन करतात l Human Psychology thinking for others mentality mental health | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Human Psychology

Human Psychology : इतरांचा विचार करणारेच नेहमी त्रास का सहन करतात?

Human Psychology : माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस भावनांच्या विळख्यात वावरत असतो. कधी तो कोण काय म्हणेल याचा विचार करतो तर कधी इतरांसाठी म्हणून विचार करत असतो.

कोण काय म्हणेल याचा विचार करताना स्वतःसाठीच्या गोष्टी समजून न घेता इतरांच्या दृष्टीकोनातून स्वतःचा विचार करतो. तर दुसरे म्हणजे आपणच इतरांचा विचार करतो आणि त्यामुळे स्वतःचा त्रास वाढवून घेतो.

माणसाला बुद्धी आणि पर्यायाने विचार करण्याची देणगी लाभली आहे. इतरांसाठी विचार करणे ही खरंतर चांगली गोष्ट आहे. पण इतरांचा विचार करत जगण्यामुळे आपण आपल्या आधी त्यांना प्रायोरीटी देतो. इतरांचा विचार करताना त्यांच्यातच गुंतून जातो. त्यामुळे स्वातःचे स्व त्व बाजूला राहते. त्यामुळे उलटा त्रास आपल्याला सहन करावा लागतो.

बऱ्याचदा आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला दुखावणे किंवा कोणाला कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेतो. पण हा इतरांचा विचार करताना आपण स्वतःला दुय्यम स्थान देत त्रास करून घेतो. बऱ्याचदा आपल्या सहनशक्तीच्या पलिकडेही आपण त्रास सहन करण्याची ताकद दाखवण्याची तयारी ठेवतो.

नक्की काय करावे?

इतरांसाठी विचार करताना आपण आपली एक मर्यादा ठरवली पाहिजे. ज्यामुळे दुसऱ्यांना न्याय देताना आपण स्वतःवर अन्याय होऊ देणार नाहीत. जो व्यक्ती स्वतःसाठी विचार करतो त्याला आपण स्वार्थी म्हणतो. पण जो स्वतःऐवजी इतरांसाठी झटतो आणि स्वतः त्रास सहन करतो त्याला समाज महान म्हणतो. ही मानसिकता असल्याने आपण आपल्यासाठी कमी आणि इतरांसाठी जास्त विचार करतो.

जर आपण इतरांसाठी विचार करतो ते चांगले आहे. पण इतरांच्या विचारांनी चालणे हे चुकीचे आहे. आपल्या विचारांचा आपल्या जीवनासाठी काय उपयोग आहे, आपला रिमोट इतरांच्या हातात तर नाही ना याचा विचार करायला हवा.

आपला आत्मसन्मान जपले जाणे हे सुद्धा महत्वपूर्ण आहे. तो जोपासला जायलाच हवा. त्यामुळे आपल्याला त्रास होतो. कारण आपल्याला वाटतं की इतरांचा विचार केल्याने सगळं सुरळीत होईल पण लोक आपल्याला गृहित धरायला लागतात.

त्यासोबत आपण हे पण स्वीकारलं पाहिजे की, आयुष्याच्या प्रवासात सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतीलच असं नसतं. आहे ती परिस्थीती स्वीकारत जगण्याची वाट आपण निर्माण करायला हवी.

टॅग्स :mental health