
मी ५२ वर्षांची आहे. मला सध्या सूर्यप्रकाशाची ॲलर्जी येणे सुरू झाले आहे. जराही सूर्यप्रकाशात गेले की खाज सुटते, त्वचेवर चट्टे पडतात, काळे डाग पडतात. मी सनस्क्रीन वापरते, स्कार्फ बांधते तसेच बरीच औषधे घेतली तरीही फारसा फरक पडत नाही. कृपया योग्य उपाय सुचवावा.
- योगिता पाटील, पुणे
तळलेले, आंबवलेले, आंबट पदार्थ, सिमला मिरची, मश्रूम, गवार, वांगे वगैरे गोष्टी आहारातून वर्ज्य कराव्या. रोज रात्री झोपताना संतुलन सॅनकूलसराखे चूर्ण घेऊन पोट नीट साफ राहील याची काळजी घ्यावी. संतुलन पंचकर्म करून घेतल्यास अशा प्रकारचे ॲलर्जीचे त्रास कमी होतात असा अनुभव आहे.