
डॉ. बालाजी तांबे
पंचवार्षिक योजना देशविकासासाठी आवश्यक असते, तसेच व्यवसायासाठी संपूर्ण वर्षाचे पूर्वनियोजन करावे लागते. आधुनिक जगात गती हा यशाचा शब्द ठरलेला आहे, पण त्यामुळे कधी माणूस काळाच्या पुढे, तर कधी काळ माणसाच्या पुढे धावत असतो. अशी ही स्पर्धा अतिशय वेगाने सुरू असताना कोठल्याही गोष्टीचे नियोजन करणे खूप अवघड असते, म्हणूनच नियोजनाचे महत्त्व खूप असते. भारतीय ऋषिमुनींनी भविष्यात पाहून काळाच्या ओघात टिकणारी तत्त्वे सांगून ठेवली आहेत. आधुनिक युगात केवळ आयुर्वेदच उपयोगी पडेल हे त्यांनी त्या वेळीच ओळखून त्याचे नियोजन करून ठेवले.