

Understanding Pro-biotics: The Science of Beneficial Bacteria
Sakal
प्रो-बायोटिक्स हा एक नवीन शब्द व विषय सध्या आरोग्य क्षेत्रात गाजत आहे. पचन नीट होत नसले किंवा पोटात दुखत असले तर काही गोळ्या मिळतात. त्यात बॅक्टेरिया म्हणजे अति सूक्ष्म जीवाणू असतात असे बरेच संशोधन चालू आहे. काही औषधे बाजारात आलेलीच आहेत, नको असणाऱ्या जंतूंना मारण्यासाठी अँटिबायोटिक्स व आरोग्यासाठा उपयुक्त प्रो-बायोटिक्स. एक गोष्ट मात्र निश्र्चित की जिवाच्या मदतीला शेवटी जीवच येतो व जीवच जिवाला जीव देतो. ज्या क्रिया मनुष्य करू शकत नाही किंवा ज्या क्रियांची जबाबदारी मनुष्य स्वतःवर घेऊ शकत नाही किंवा वनस्पती वा औषधी योजनेत संबंधित कार्य होऊ शकत नाही, तेव्हा ते काम शेवटी परमेश्र्वरी सृजनातून उत्पन्न झालेल्या रचनेतून वा जिवाकडूनच करून घ्यावे लागते.