Proteinssakal
आरोग्य
आहारामध्ये प्रोटिन्सचे महत्त्व
आपल्या शरीरातील बहुतेक सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रोटिन्स महत्त्वाची भूमिका बजावतात.
- महेंद्र गोखले, फिटनेसविषयक प्रशिक्षक
आपले शरीर हे एक मशीन आहे असे मानले, तर शरीराची देखभाल करणे, आवश्यक तेव्हा दुरुस्ती करणे, स्नायूंची योग्य वाढ होणे आणि एन्झ़ाइम्स आणि हार्मोन्स तयार करणे अशा अनेक कार्यांसाठी आपल्याला प्रथिने म्हणजे प्रोटिन्स आवश्यक असतात. त्यांना अनेकदा जीवनाचा ‘बिल्डिंग ब्लॉक’ म्हटले जाते.