Bhujangasana Benefits: महिलांसाठी वरदान ठरणारं आसन; जाणून घ्या 'भुजंगासना'चे आरोग्यदायी फायदे!

How to do Bhujangasana step by step for beginners: फक्त २ मिनिटं भुजंगासन करा आणि पचन, पाठदुखी, गर्भाशयासंबंधी तक्रारींवर नैसर्गिक उपाय मिळवा.
Bhujangasana for PCOS, digestion, and back pain
Bhujangasana for PCOS, digestion, and back painsakal
Updated on

Bhujangasana for PCOS, digestion, and back pain: योगासनासाठी सूर्योदयापूर्वी तासभर तरी आधी उठावे. अशावेळी शरीराची विश्रांती झाल्यामुळे बुद्धी शुद्ध व सात्त्विक असते. चूळ भरून कोमट पाणी प्यावे, शौचाला साफ झाल्यानंतर ऋतुमानाप्रमाणे थंड किंवा गरम पाण्याने स्नान करून योगासनांच्या अभ्यासाला सुरुवात करावी. रजस्वला महिलांनी आसन करू नये. गर्भवती महिलांनी केवळ तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच योगासने करावीत. ज्वर आला असताना, जोराचा वारा चालत असताना, कोंदट हवेत व्यायाम करू नये.

भुजंगासन

या आसनात शरीराची स्थिती फणा काढलेल्या सापासारखी होते.

Bhujangasana for PCOS, digestion, and back pain
Yoga for Busy Lifestyle: धावपळीच्या जीवनात शरीर अन् मनाच्या आरोग्यासाठी ‘षट्क्रिया’ आणि योगाचे अद्भुत लाभ

योग्य पद्धत

भुजंगासनाची स्थिती:

उपडे झोपून डोक्‍यासमोर हात पसरून पायाचे तळवे आकाशाकडे करून टाचा जुळवून ठेवणे.

(1) दोन्ही हात छातीच्या बाजूला तळवे जमिनीवर टेकून ठेवावेत.

(2) श्वास घेऊन नाभीच्या वरचा भाग उचलावा. दृष्टी छताकडे ठेवावी. पूर्णस्थिती.

(3) हळूहळू श्वास सोडत डोके खाली ठेवा.

(4) पूर्वस्थिती.

(5) दोन्ही हात मांड्यांवर उपडे ठेवा.

(6) श्वास घेऊन डोके व छाती वर उचलावी. ही आसनाची पूर्णस्थिती.

(7) श्वास सोडत डोके खाली ठेवावे.

(8) आणि पूर्वस्थितीत यावे.

वेळ

2 मिनिटे

Bhujangasana for PCOS, digestion, and back pain
Tadasana Benefits: उंची वाढवायचीये? दररोज फक्त 3 मिनिटं 'ताडासन' करा! लगेच दिसतील बदल

लाभ

स्त्रियांचे गर्भाशय, मासिक पाळीसंबंधी विकार दूर होतात.

छाती, फुप्फुस, हृदय, पाठीचे रोग समाप्त होतात.

मंदाग्नी दूर होऊन पचनशक्ती व भूक वाढते.

मधुमेहात फायदा होतो.

- चारुता वाडेगावकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com