

Pune’s Increasing Air Pollution Linked to Growing Nasal Polyps Cases, Say Residents
sakal
Health News in Marathi : एकेकाळी थंड हवेचे ठिकाण आणि वनराईने फुललेल्या तसेच शुद्ध प्राणवायू मिळणाऱ्या पुणे शहरातील लोकांचा श्वास सध्या गुदमरतोय, याचा प्रत्यक्ष अनुभव मला आला. दूषित हवेमुळे तसेच धुळीचे उठणारे लोळ यामुळे श्वसनाचा पॉलिप्स (नाकातील गाठी) विकार मला झाला असून नाक-कान-घसातन्ज्ञांनी शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले आहे. प्रदूषित हवेने श्वास कंठाशी आल्याची भावना बिबवेवाडी येथील रहिवासी विजय आकुर्डेकर यांनी व्यक्त केली.