

What Did Virat Kohli Drink in IND VS NZ ODI That Caused Him to Make Weird and Funny Faces
Sakal
Virat Kohli Mystery Drink Revealed : इंदौरच्या होळकर स्टेडिअमवर रविवारी झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने ५४वं एकदिवसीय शतक झळकावलं. त्यामुळे त्याचं सगळीकडेच कौतुक झालं. पण या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये विराट कोहली बॅटिंग करताना मध्येच उभा राहून एक छोट्या पॅकेटमधून काहीतरी ज्यूस पिताना दिसत आहे. मात्र ते ज्यूस पिताच त्याने तोंड वाकडं केल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यानंतर केळ खाऊन पुन्हा एक घोट घेऊन तो ते ज्यूस गिळताना दिसत आहे.