Blood Quality Standards: रक्ताच्या शुद्धतेची आता खात्री! भारताने ठरवला जगातला पहिलाच मानदंड

India Sets Global Benchmark for Blood Quality Standards: रक्त आणि रक्तघटकांसाठी विशेष गुणवत्ता मानके निश्चित करणारा भारत जगातील पहिला देश ठरला असून, यामुळे रक्तसंक्रमण सेवा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार आहेत.
India Sets Global Benchmark for Blood Quality Standards

India Sets Global Benchmark for Blood Quality Standards

sakal

Updated on

भारतीय औषधकोशामध्ये (इंडियन फार्माकोपिया-२०२६) रक्त आणि रक्तातील घटकांसाठी विशेष मानके निश्चित करण्यात आली असून, अशा प्रकारचा निर्णय घेणारा हा जगातील पहिलाच औषधकोश ठरला आहे. रक्तसंक्रमण सेवांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि रुग्णांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. औषधांच्या गुणवत्तेच्या मानकांचा अधिकृत संग्रह म्हणजे 'फार्माकोपिया' होय. यातील मानकांनुसार औषधांची ओळख, शुद्धता आणि क्षमता सुनिश्चित केली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com