

Importance of marriage in Indian culture
sakal
स्त्री व पुरुष यांच्यामध्ये आकर्षण असणे हा निसर्गाचा नियम होय. निसर्गचक्र सुरू राहावे यासाठी फक्त मनुष्यप्राण्यांतच नाही तर प्रत्येक सजिवामध्ये पुनरुत्पादनाची संकल्पना निसर्गतःच असते. त्यासाठी विरुद्धलिंगी आकर्षणही आवश्यक असते. भारतीय संस्कृतीमध्ये ‘विवाह’ हा एक संस्कार म्हणून सांगितलेला आहे. विवाहसंस्कारातून गृहस्थाश्रमाची सुरुवात होते. याचे मुख्य उद्दिष्ट निरोगी, संपन्न, एकमेकांना अनुकूल स्त्री-पुरुष एकमेकांशी बांधले जावेत व त्यातून निरोगी अपत्याचा जन्म होऊन सृष्टिचक्र चालू राहावे हा असतो. विवाहसंस्कार समाजव्यवस्थेचाही मूलभूत पाया असतो.
अर्थातच स्त्री-पुरुषामधील आकर्षण नैसर्गिक असले तरी त्याला संस्कारांची मर्यादा असावी लागते, तरच त्यातून स्त्री-पुरुषांचा उत्कर्ष होऊ शकतो, उत्तम संतती जन्म घेऊ शकते. विवाहामागची शास्त्रीय भूमिका किती महत्त्वाची आहे हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे.