Infectious Diseases and the Monsoon
sakal
- डॉ. मालविका तांबे
पावसाळा आला की सर्वत्र निरनिराळ्या प्रकारचे रोग डोकं उचलू लागतात. सर्वत्र पाऊस पडत असल्यामुळे वातावरणामध्ये आर्द्रता असते, ऊब असते आणि त्यामुळे सगळ्याच प्रकारचे जीवजंतू या काळामध्ये उत्पन्न होत असतात. त्याचमुळे वेगवेगळ्या प्रकारचे संक्रामक रोग या काळात बळावत असतात आणि त्यात कृमी विकार हे सगळ्यांमध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवतात.