इनर इंजिनिअरिंग : प्रेमाचे रसायनशास्त्र

भावना, रसायनशास्त्र आणि साधना यांचा संगम; योग, प्राणायाम व ध्यानातून अंतर्गत रासायनिक प्रक्रिया बदलून प्रेम व शांततेची नैसर्गिक अवस्था घडवण्याचा मार्ग
Sadhguru

how meditation pranayama yoga and bhakti can change body chemistry emotions and inner experience according to sadhguru inner engineering

sakal

Updated on

सद्‍गुरू, ईशा फाउंडेशन

सद्‍गुरू : तुम्ही ज्या ज्या भावनेतून जाता, त्या प्रत्येक भावनेमागे एक विशिष्ट रासायनिक प्रक्रिया असते. तुम्ही आनंदी व्हा किंवा दुःखी व्हा, तणावाखाली असा किंवा शांत असा, तुमची रासायनिक प्रक्रिया वेगवेगळ्या प्रकारे घडत असते. हे दोन्ही बाजूंनी काम करते - एखादी भावना तुमची रासायनिक प्रक्रिया बदलू शकते, आणि तुमची रासायनिक प्रक्रिया बदलल्याने तुमची भावना बदलू शकते. आपण ज्या वेगवेगळ्या अनुभवांच्या अवस्थांमधून जातो, त्यानुसार आपली रासायनिक प्रक्रिया स्वाभाविकपणे काही बदलांमधून जाते; किंवा आपली रासायनिक प्रक्रिया बदलांमधून जात असल्यामुळे, आपण अनुभवाच्या वेगवेगळ्या टप्प्यातून जातो. उदाहरणार्थ, तुम्ही उत्तेजित झालात, तर तुमचे रक्त वेगाने वाहू लागेल आणि तुमचे हृदय वेगाने धडधडू लागेल, ही एक गोष्ट झाली; पण आता जर तुमचे हृदय विनाकारण वेगाने धडधडू लागले, तर तुम्ही विनाकारण उत्तेजित व्हाल. दोन्ही गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com