इनर इंजिनिअरिंग : घरातही शरीरासाठी योग्य स्थितीचे महत्त्व

योगिक आसनांमधून चेतनेची पातळी उंचावण्याचा मार्ग; बसण्याच्या साध्या सवयींनीही विचार, भावना आणि जीवनानुभवात आमूलाग्र बदल शक्य
The Science of Posture: How Your Sitting Style Affects Your Consciousness

The Science of Posture: How Your Sitting Style Affects Your Consciousness

Sakal
Updated on

सद्‍गुरू, ईशा फाऊंडेशन

सद्‍गुरू : तुम्ही दैनंदिन जीवनात स्वतःचे निरीक्षण केले असेल, तर तुमच्या लक्षात आले असेल, की तुम्ही अनुभवत असलेल्या मानसिक आणि भावनिक परिस्थितीच्या वेगवेगळ्या पातळ्यांनुसार, तुमच्या चेतनेच्या वेगवेगळ्या अवस्थांनुसार, तुमचे शरीर नैसर्गिकरीत्या एक विशिष्ट मुद्रा धारण करते. जेव्हा तुम्ही आनंदी असता, तेव्हा एका विशिष्ट प्रकारे बसता, आणि तुम्ही दुःखी असता, तेव्हा दुसऱ्या प्रकारे बसता. तुम्ही शांत असता, तेव्हा एका प्रकारे बसता, आणि तुम्ही रागावलेले असता, तेव्हा बसण्याची पद्धत दुसऱ्या प्रकारची असते. आता समजा तुम्ही घरी गेलात आणि तिथे कोणीतरी आहे; तुम्ही फक्त त्यांच्या बसण्याच्या पद्धतीचे निरीक्षण केले, तर त्यांच्यासोबत काय घडत असेल याचा अंदाज तुम्हाला लावता येतो. याचे कारण हेच आहे की, चेतनेच्या पातळीनुसार तुमचे शरीर एक विशिष्ट मुद्रा धारण करते. यावरच आधारित, आसनांचे (योगिक मुद्रांचे) शास्त्र आहे - म्हणजेच, जाणीवपूर्वक आपल्या शरीराला एका विशिष्ट मुद्रेत आणून, तुम्ही तुमच्या चेतनेची पातळीदेखील उंचावू शकता. केवळ एका विशिष्ट प्रकारे बसून तुम्ही तुमच्या भावना, विचार, आकलन आणि जीवन जगण्याचा अनुभव पूर्णपणे बदलू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com