Interesting Science Fact : तुम्हाला कोणाच्या स्पर्शाने कधी करंट लागलाय? हे प्रेम नाही तर सायन्स आहे l Interesting Science Fact Suddenly Touches Someone Feel Shocked Why | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Interesting Science Fact

Interesting Science Fact : तुम्हाला कोणाच्या स्पर्शाने कधी करंट लागलाय? हे प्रेम नाही तर सायन्स आहे

Why Do We Feel Shock if Suddenly Touches Someone : बऱ्याचदा एकाद्या व्यक्तीच्या स्पर्शाने आपल्याला अचानक करंट लागतो. सिनेमामध्ये एकाद्या मुलीच्या स्पर्शाने मुलाला करंट लागतो तो हा नव्हे बरं का! हा करंट सहज कुठल्या वस्तूला, व्यक्तीला स्पर्श होतो न होतो तोच स्पार्किंग झाल्यासराखं, शॉक लागल्यासारखं आपल्याला कधी कधी होतं. कधीतरी स्पार्किंगची बारीकशी ठिणगी उडाल्यासारखंही वाटतं.

प्लास्टिकच्या खूर्चीवर घरी किंवा ऑफीसमध्ये बसून उठलो की साधारणतः याचं प्रमाण जास्त असतं. त्यातही हिवाळ्यात हे प्रमाण अधिक असतं. कधी हे अगदी शॉक लागल्यासारखं वाटतं तर कधी फक्त सूई टोचल्यासारखे. पण यामागे कारण काय, जाणून घ्या.

का लागतो करंट?

अशाप्रकारे शरीरात लागणाऱ्या करंटला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणतात. याच्या मागे एक खूप साधं विज्ञान आहे. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्युट्रॉन्स मिळू एक अॅटम बनतो. यांची बॅलंस्ड एनर्जी असते. यात काही गडबड झाली तर यांचा बँलंस्ड बिघडला किंवा इलेक्ट्रॉन वाढला तर अॅटोमिक एनर्जी निगेटिव्ह चार्ज होते. इलेक्ट्रॉनचा हाच लॉस शरीराला अचानक झटका देतो. हे थंड आणि कोरड्या वातावरणात जास्त होतं. कारण ओल्या वातवरणात हे चार्ज होण्याची शक्यता कमी होते.

हे कसे थांबवावे?

जेव्हाही एखाद्या धातूच्या वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श होताच हे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आपल्या शरीराला वेगात सोडतात. त्यामुळे झटका लागतो. नायलॉन आणि पॉलिस्टर सारखे फायबर्सपण इलेक्ट्रॉनिक शॉक देतात. बेकींग सोडा या कामात मदत करतो. शिवाय मॉइश्चराइझेशननेपण झटका लागण्याची शक्यता कमी होते.

टॅग्स :bodyEnergy