
नवी दिल्लीः हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. CNBC च्या अहवालानुसार, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) आता हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियम वाढीस मर्यादा घालण्याचा विचार करत आहे. IRDAI लवकरच एक कन्सल्टेशन पेपर जारी करू शकतो, ज्यात कंपन्या मनमानीपणे प्रीमियम वाढवू शकणार नाहीत, असा नियम असू शकतो.