ओमीक्रॉन डेल्टापेक्षा कमी गंभीर व्हेरिअंट आहे का? काय सांगतात तज्ज्ञ | Omicron And Delta Variant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओमीक्रॉन डेल्टापेक्षा कमी गंभीर व्हेरिअंट आहे का? काय सांगतात तज्ज्ञ

ओमीक्रॉन डेल्टापेक्षा कमी गंभीर व्हेरिअंट आहे का? काय सांगतात तज्ज्ञ

तुम्ही आत्ता युनायटेड स्टेट्समध्ये COVID-19 पॉझिटव्ह आढळला तर, तो ओमिक्रॉन व्हेरिअंटचा संसर्ग (Omicron variant)असण्याची शक्यता जास्त आहे, ज्याचा आता देशातील नोंदवलेल्या प्रकरणांपैकी सुमारे 95 टक्के लोकांमध्ये संसर्ग झाला आहे. डझनभर उत्परिवर्तनांसह(mutations), ओमिक्रॉन हे पूर्वीच्या प्रबळ डेल्टा व्हेरियंटपेक्षा खूप वेगळा आहे, याचा अर्थ, गेल्या दोन वर्षांमध्ये जोखीम हाताळल्यानंतर, तुम्हाला तुमच्या किमान काही सवयींमध्ये बदल करण्याची आवश्यकता असू शकते.

ओमिक्रॉन अधिक संक्रमणक्षम आहे आणि उपलब्ध अँटीबॉडीज टाळण्यास अधिक सक्षम आहे. “माझ्यासाठी हा सर्वात मोठा बदल आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही गोष्ट किती आश्चर्यकारकपणे संसर्गजन्य आहे. मी माझ्या आयुष्यात इतके संसर्गजन्य कधीच काही पाहिले नाही,” असे मत अटलांटा जॉर्जिया येथील एपिडेमियोलॉजिस्ट आणि संसर्गजन्य रोग विशेषज्ञ एमोरी विद्यापीठ कार्लोस डेल रिओ यांनी व्यक्त केले. त्याच वेळी, ओमीक्रॉनची विविध लक्षणे दिसत आहेत आणि कमी गंभीर रोग असल्याचे दिसून येत नाही. तरीही, SARS-CoV-2 चे वेगवेगळे व्हेरिअंटमध्ये महत्त्वाची समानता दिसू येते आणि लसीकरण करा, मास्क वापरा असे बहुतेक मूलभूत सार्वजनिक आरोग्य सल्ले देखील सारखेच आहेत. ओमीक्रॉन व्हेरिअटंचा संसर्ग काळात सुरक्षित राहण्याबद्दल नवीन संशोधन काय सांगते जाणून घेऊ या (Is Omicron really less severe than Delta? Here's what the science says)

हेही वाचा: 2022मध्येही कोरोना महामारीचे नियम पाळून वैतागलाय, कसा कराल सामना?

ओमीक्रॉन खरोखर डेल्टा पेक्षा कमी गंभीर रोग आहे का?Is Omicron really causing less severe disease than Delta?

जगाच्या विविध ठिकाणी आढळलेल्या अनेक पुराव्यांवरून असे दिसते की, ओमिक्रॉन व्हेरिअंट कोविड-19 चे कमी गंभीर स्वरूप आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन प्रथम नोव्हेंबर 2021 मध्ये आढळला होता. एका खाजगी आरोग्य विमा प्रशासकाने डिसेंबरच्या मध्यात अहवाल दिला की, काही महिन्यांपूर्वी संसर्ग झालेल्या प्रौढांच्या तुलनेत ओमिक्रॉन असलेल्या प्रौढांना रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 29 टक्के कमी होती.

यूकेमध्ये, 31 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या यू.के. हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या संशोधनाच्या सारांशानुसार, ओमीक्रॉन संर्सग झालेल्या लोकांचा हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी रुममध्ये दाखल होण्याचा दर डेल्टापेक्षा एक तृतीयांश होता.

जानेवारीच्या सुरुवातीस केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केलेल्या प्राथमिक कामानुसार, ओमिक्रॉन असलेल्या यूएस प्रौढांना हॉस्पिटलमध्येइमर्जन्सी रुममध्ये दाखल होण्याचा किंवा व्हेंटिलेटरवर ठेवण्याची शक्यता निम्म्याहून कमी होती. या अभ्यासाचे अद्याप पुनरावलोकन केले गेले नाही, 14,000 हून अधिक रूग्णांच्या डेटाचे आणि त्यांच्या लसीकरण स्थिती आणि पूर्व-अस्तित्वात असलेल्या आजाराबाबत परीक्षण केले

डेल रिओ म्हणतात की,''लक्षणांमधील बदल त्या ट्रेंडला दर्शवितो. पूर्वीच्या लाटेमध्ये दिसल्याप्रमाणे, न्यूमोनियासारखी लक्षणे आणि अतिक्रियाशील रोगप्रतिकारक प्रणाली असलेले रुग्ण हॉस्पिटलमध्ये कमी वेळा दिसून येत आहेत. त्याऐवजी रक्तसंचय आणि घसा खाज सुटण्याची लक्षणे रुग्णांमध्ये अधिक वेळा दिसून आली. "ओमिक्रॉनमध्ये, सर्दीसारखी लक्षणे दिसून आली असे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: कोरोना व्हेरिएंटचं नाव 'ओमिक्रॉन' कसं पडलं? जाणून घ्या सर्वकाही

वय किंवा आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांनुसार तीव्रता भिन्न असते का?

केस वेस्टर्न स्टडीनुसार, ''ओमिक्रॉन सर्व वयोगटांमध्ये डेल्टा पेक्षा कमी गंभीर असल्याचे दिसून येते, अगदी 65 पेक्षा जास्त वयाच्या प्रौढांमध्ये आणि लसीकरण न होण्याइतपत लहान मुलांमध्येही. तरीही, इतर आरोग्य समस्यांप्रमाणेच, वय हा एक घटक आहे,'' असे डेल रिओ म्हणतात. "कोणत्याही आजारासाठी, जर तुमचे वय अधिक असेल, तर तुम्हाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते'', असेही ते म्हणाले.

''जसे की लसीकरण न केलेले लोक असुरक्षित आहेत त्याप्रमाणे आधीपासून आजार असलेले किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले लोक देखील अधिक असुरक्षित आहे.'' जरी सध्याच्या लस डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनची लक्षणे रोखण्यासाठी कमी प्रभावी आहेत, यूकेच्या अहवालात असे आढळून आले की, ''ज्या लोकांची लसीकरण पुर्ण झाले होते त्यांची लस न दिलेल्या लोकांच्या तुलनेत ओमिक्रॉनच्या रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 88 टक्के कमी होती.'' देशभरातील रुग्णालये नोंदवतात की, ''लसीकरण न केलेले रूग्ण आता अतिदक्षता विभागात आहेत.

वय किंवा आरोग्याची स्थिती विचारात न घेता, ओमिक्रॉनची लागण झालेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये जावे लागत नसले तरीही ते भयंकर त्रास होऊ शकतो आणि या व्हेरिअंटमुळे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागत आहे आणि कित्येकांना आपले प्राण गमावावे लागत आहे.असे जागतिक आरोग्य महासंचालक टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या virtuaL पत्रकार परिषदेत सांगितले. .

हेही वाचा: Omicron Variant : मी स्वत:ला सुरक्षित कसे ठेऊ शकतो?

डेल्टापेक्षा कमी तीव्र असल्यास ओमिक्रॉन धोकादायक का आहे? Why is Omicron dangerous if it’s less severe than Delta?

अद्याप समीक्षकांचे पुनरावलोकन न केल्या गेलेल्या डॅनिश अभ्यासानुसार,'' ओमिक्रॉन डेल्टापेक्षा दोन ते चार पट जास्त सांसर्गिक आहे'' लसींद्वारे उत्तेजित होणार्‍या ऍन्टीबॉडीजपासून बचाव करण्यासाठी देखील तो व्हेरिअंट अधिक सक्षम आहे, म्हणूनच तो अधिक संक्रमणास कारणीभूत ठरत आहे. परिणामी, अधिक लोक आजारी पडत आहेत आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्याचे दिसून येत आहेत, जिथे अधिक कर्मचारी देखील आजारी पडत आहेत. ''असे डेल रिओ यांनी सांगितले.

ओमिक्रॉनच्या स्पाइक प्रोटीनमध्ये 36 उत्परिवर्तन (mutations)करत आहेत, जे मानवी पेशींवर व्हायरस अँकर करण्यासाठी आणि त्यांना संक्रमित करण्यासाठी आवश्यक भाग आहे. अद्याप कोणतेही पुनरावलोकन केले नसले तरी, लहान प्राण्यांचा मॉडेल वापरून जसे की उंदीर आणि हॅमस्टर किमान अर्धा डझन संशोधन केले आहे आणि प्रयोगशाळेतील सेल कल्चर (cell cultures) हे शोधले आहे की, ''हे उत्परिवर्तन ओमिक्रॉन पेशींमध्ये प्रवेश करण्याच्या आणि प्रतिकृती बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वत:मध्ये कसा बदल करतात.'' असे जॉन मूर यांनी सांगितले जे न्यूयॉर्कमधील वेल कॉर्नेल मेडिसिनमधील लस संशोधक आणि विषाणूशास्त्रज्ञ आहेत.

"व्हायरसचा कोणता प्रकार आहे याने काही फरक पडत नाही, एकदा त्याची प्रतिकृती बनवल्यानंतर, जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे किंवा मरतो तोपर्यंत तो पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो," असे मूर यांनी सांगतिले. "हे सर्व जीनोम प्रतिकृतीबद्दल सारखे आहे." असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top