
Heart Disease Risks: बदलत्या जीवशैलीत, धकाधकीच्या जीवनात आपण जास्तीत जास्त बसून आणि कमीत कमी हालचालींच काम करत आहोत. दिवसाचे १० तास तरी आपण बसून असतो. मग ते प्रवास करताना असो, ऑफिस मध्ये काम करताना असो की कॉलेज मध्ये लेक्चर करताना असो, दैनंदिन जीवनातील आपल्याला आवश्यक असलेल्या हालचाली कमी होऊ लागल्या आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, दरवर्षी हृदयविकारामुळे १७.९ दशकल्क्ष लोकांचा मृत्यू होतो. यातल्या बऱ्याच जणांचा मृत्यू टाळता येऊ शकतो असे तज्ज्ञ सांगतात.