
हृदयाच्या धमन्यांमध्ये प्लेक जमा झाल्यामुळे इस्केमिक हृदयरोग होतो, ज्यामुळे हृदयाला ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा कमी होतो. याची लक्षणे छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे आहेत. उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि मधुमेह यामुळे या आजाराचा धोका वाढतो.
Ischemic Heart Disease: चुकीची जीवनशैली किंवा आहार यामुळे हृदयासंबंधित समस्या निर्माण होतात. इस्केमिक हृदयरोगाला कोरोनरी आर्टरी डिसीज असेही म्हणतात. हा सर्वात सामान्य हृदयरोग आहे. जेव्हा हृदयाच्या धमन्या म्हणजेच कोरोनरी धमन्या ब्लॉक होतात किंवा अरुंद होतात तेव्हा हा आजार होतो, ज्यामुळे हृदयाकडे ऑक्सिजन आणि रक्ताचा प्रवाह कमी होतो. ही एक अतिशय गंभीर स्थिती आहे. इस्केमिक हृदयरोगाचे मुख्य कारण म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी, कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थ जमा होणे, ज्यामुळे रक्त प्रवाह योग्यरित्या होऊ शकत नाही.