
Flu Outbreak in Japan | Over 4000 Hospitalised
sakal
Flu Outbreak in Japan 2025: जपानमध्ये सध्या कोरोना महामारीसारखीच परिस्थिती उद्भवली आहे. १३५ पेक्षा जास्त शाळा, किंडरगार्टन, आणि डेकेअर सेंटर काही काळासाठी बंद करण्यात आले आहेत. कारण जपानमध्ये तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक रुग्णालयेही भरली आहेत. ४ हजारांहून अधिक रुग्ण आढळल्यामुळे जपान सरकारने फ्लूची साथ पसरल्याची अधिकृत घोषणा केली आहे. तसेच आरोग्य विभागाने लोकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
परंतु यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच ही परिस्थिती कोरोना महामारीसारखी होईल का याची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीयांनीही सतर्क राहावे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.