

Jaw, Neck, and Headache Connection: Symptoms & Medical Insights
esakal
Jaw, Neck, and Headache: सकाळी झोपेतून उठल्यावर अचानक जबडा जड वाटणे, मान आखडणे किंवा डोक्याच्या मागच्या बाजूला तीव्र वेदना होणे, असा त्रास अनेकांना जाणवतो. बऱ्याचदा लोक या समस्येकडे साधा थकवा किंवा झोपण्याची चुकीची पद्धत समजून दुर्लक्ष करतात. पण, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, जबडा, मान आणि डोकेदुखी या तिन्हींचा आपसुकच अतिशय जवळचा संबंध असू शकतो. शरीरातील या भागांची रचना, स्नायूंचे कार्य आणि मज्जासंस्थेतील परस्परसंबंध समजून घेतल्यास वेदनांचे मूळ कारण अधिक चांगल्या प्रकारे ओळखता येऊ शकते.