

Don’t rush to solve everything at once — focus on what you can do right now, one step at a time.
Sakal
देवयानी एम., लाइफस्टाइल कोच
मी गेल्या काही वर्षांत दिलेल्या अनेक परीक्षांमध्ये एक गोष्ट प्रत्येक पेपरच्या वेळी केली आहे. पेपर समोर आला, की ना मी सगळ्यांसारखा तो अख्खा पटापट वाचून काढायचे, ना लगेच सोडवायला सुरू करायचे. प्रश्नपत्रिका मिळाली, की ती मी आधी उलटी करून ठेवून द्यायचे आणि दोन मिनिटं डोळे मिटून हळू आवाजात भ्रामरी प्राणायाम करायचे. ते झालं, की मग प्रश्नपत्रिका सुलटी करून फक्त पहिला प्रश्न शांतपणे वाचून त्याचं उत्तर लिहायचे. असं एकएक करत शेवटपर्यंत...