

Importance of Supportive Environment in Quality of Life: Dr. Prajakta Sahasrabuddhe
Sakal
डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (पीटी), प्राध्यापक आणि सल्लागार, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी
जीवनाची गुणवत्ता ही केवळ व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यावर अवलंबून नसते. दैनंदिन कामे शक्य तितकी स्वतः करता येणे, निर्णय घेता येणे, इतरांमध्ये सहभागी होता येणे आणि स्वावलंबीपणे जगता येणे यालाही तितकेच महत्त्व आहे. व्यक्तीची स्वावलंबिता तिचे शारीरिक आरोग्य, फिटनेस आणि इच्छाशक्ती यांबरोबरच तिच्या सभोवतालच्या वातावरणावरही अवलंबून असते. त्यामुळे रुग्ण असो किंवा निरोगी व्यक्ती, चांगल्या जीवनमानासाठी अनुकूल वातावरण ही महत्त्वाची गरज आहे.