Understanding Jnana Yoga
सद्गुरू ( ईशा फाउंडेशन)
इनर इंजिनिअरिंग
सद्गुरू : ज्ञानाचा अर्थ तत्त्वज्ञान असा नाही, ज्ञान म्हणजे ‘जाणून घेणे.’ दुर्दैवाने, तत्त्वज्ञान हेच आजकाल ज्ञानयोग म्हणून ओळखले जात आहे. मुळात, जर तुम्हाला ज्ञानाचा पाठपुरावा करायचा असेल, तर तुम्हाला अतिशय जागृत, धारदार बुद्धी हवी आहे. प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणी तुम्ही हळूहळू तुमची बुद्धी अशा बिंदूपर्यंत धारदार केली पाहिजे, की जिथे ती अतिशय तीक्ष्ण झाली आहे. मग ती काहीही चुकवत नाही. ती कशाच्याही आरपार जाऊ शकते, पण तिला काहीही चिकटून राहत नाही, आजूबाजूला जे काही घडत आहे त्याचा तिच्यावर प्रभाव पडत नाही, हेच ज्ञान आहे.