
Early Signs Of Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती अधिकृत निवेदनात देण्यात आली. रविवारी (18 मे) बायडन यांच्या कार्यालयाने सांगितले की, 82 वर्षीय बायडन यांनी लघवी करण्यास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यांच्या प्रोस्टेटमध्ये एक लहान गाठ आढळून आली. पुढील तपासणीनंतर, तो कर्करोग असल्याचे आढळून आलं, जो आता त्याच्या हाडांमध्ये पसरला आहे.