सद्गुरू: जेव्हा तुम्ही रात्री आकाशाकडे पाहता, तेव्हा तुम्हाला अनेक तारे दिसतील; पण तुम्हाला दिसणारे तारे हे तिथल्या संपूर्ण शक्यतेचा एक लहानसा भाग आहेत. या विशाल रिक्तपणामध्ये हे ताऱ्यांचे काही ठिपके आहेत. तिथे सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे रिक्त जागा. या शून्यपणाच्या कुशीत बाकी सर्व काही घडले आहे.