Yoga Benefits: मन शांत ठेवण्यासाठी करा 'ही' 3 योगासने, तणावही होईल दूर

Yoga Benefits: मानसिक तणाव कमी करण्यासाठी योग करणे फायदेशीर ठरते.
Yoga Benefits
Yoga BenefitsSakal

kapalbhati savasana bhujangasana best yoga for reduce tension depression good mental health

सध्याच्या व्यस्त जीवनामुळे लोक तणावग्रस्त बनले आहेत. त्यामुळेच हळूहळू मानसिक समस्या वाढू लागल्या आहेत. तुम्हीही तणावाचे शिकार असाल तर योग करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. पुढील योग प्रकार केल्याने मन शांत आणि तणाव कमी होऊ शकतो. जर तुम्ही नियमितपणे सकाळी योग केला तर दिवसभर तंदुरूस्त राहाल.

शवासन
शवासनSakal

शवासन

जर तुम्ही शवासन केले तर अनेक आरोग्यदायी होतात. हा योग केल्याने उच्च रक्तदाब आणि तणाव नियंत्रणात राहते. तसेच मानसिक आरोग्य देखील निरोगी राहते. तसेच एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवते.

कसे करावे

शवासन करताना सर्वांत आधी सपाट जागी झोपावे. डोळे बंद करावे. हळूहळू ध्यानात जाण्यास सुरूवात करावी. शवासन करताना झोपू नका. श्वास घेण्याची गती मंद ठेवावी. हळूहळू तुम्हाला रिलॅक्स वाटेल. 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचे शरीर पूर्णपणे रिलॅक्स होईल आणि तुम्हाला प्रेश वाटेल. या

Yoga Benefits
Morning Breakfast: सकाळी उठायला उशीर झालाय? मग 10 मिनिटांत बनवा हेल्दी चीला, नोट करा रेसिपी
कपालभारती
कपालभारतीSakal

कपालभारती

कपालभारती श्वसनाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते. कपालभारती केल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास मदत होते. हा योगप्रकार केल्याने फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. त्याचबरोबर शरीरात साचलेले विषारी पदार्थ बाहेर निघून जाते. तसेच, जर तुम्हाला तणावाचा त्रास होत असेल तर हा योगा नियमितपणे करावा. यामुळे मानसिक आरोग्य निरोगी राहते.

कसे करावे

सर्वात आधी जमिनिवर सरळ बसावे. खपालभारती करताना ध्यानाच्या मुद्रेत बसावे. हाताचे तळवे गुडघ्यांवर ठेवावे. पाठ सरळ ठेवा आणि दिर्घ स्वास घ्यावा. पोट आत खेचताना वेगाने श्वास सोडावा

भुजंगासन
भुजंगासन Sakal

भुजंगासन

मन शांत आणि तणाव कमी करण्यासाठी भुजंगासन करणे फायदेशीर ठरते. हा योगप्रकार नियमितपणे सकाळी करावा. यामुळे शरिरातील स्नायू मजबुत होतात.

कसे करावे

सर्वात पहिले पोटावर जोपावे. नंतर हाताचे तळवे जमिनिवर ठेऊन खांद्याखाली घ्यावे. हाताची कोपरं शरीराराला लागून समांतर असावेत. दिर्घ श्वास घेऊन डोके, छाती आणि पोटवर उचलावे. हाताचा आधार घेत तुमचे शरीर जमिनिपासून उचलून मागे टाचेकडे खेचावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com