
What is Kounis Syndrome and How Does it Affect the Heart: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचं गुरुवारी रात्री वयाच्या ५३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने इंग्लंडमध्ये निधन झालं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलो खेळताना संजय कपूर यांनी चुकून मधमाशी गिळली होती. त्यानंतर त्यांना जोरदार हार्ट अटॅक आला आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, अनेकांना प्रश्न पडला आहे की फक्त मधमाशी गिळल्याने एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो का?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हा प्रकार ‘ऍनाफिलॅक्टिक शॉक’ किंवा ‘कुनीस सिंड्रोम’मुळे घडू शकतो. कोणी मधमाशीच्या चाव्याला ॲलर्जिक असेल आणि ती मधमाशी तोंडात किंवा घशात चावली, तर शरीरात तीव्र ॲलर्जिक प्रतिक्रिया सुरू होते. या प्रतिक्रियेमुळे श्वसनमार्ग फुगतो, रक्तदाब झपाट्याने घटतो आणि हृदयाचे ठोके अनियमित होतात. या सगळ्याचा परिणाम म्हणजे कारडियाक अकेस्ट (Cardiac arrest), म्हणजेच हार्ट अटॅक.
कुनीस सिंड्रोम ही एक दुर्मिळ पण गंभीर स्थिती आहे, जिथे मधमाशी किंवा अशाच प्रकारचा कीटक चावल्यावर होणाऱ्या तीव्र ॲलर्जिक प्रतिक्रियेमुळे शरीरात हिस्टॅमिनसारख्या रसायनांचे प्रमाण अचानक वाढते, ज्यामुळे रक्तदाब खालावतो, रक्तवाहिन्यांमध्ये गाठी निर्माण होतात आणि हृदयाचे ठोके अनियमित होतात. या अवस्थेत हृदयविकाराचा झटका कोणतीही पूर्वसूचना न देता येऊ शकतो, आणि हृदयात अगोदरच प्लाक असेल तर ती ॲलर्जिक प्रतिक्रिया प्लाक फोडून Cardiac Arrest होण्याचा धोका निर्माण करते.
सिंड्रोममध्ये सुरुवात श्वास घ्यायला त्रास होण्यापासून होते आणि काही मिनिटांतच हृदयाचे ठोके बिघडतात; जर वेळेवर उपचार झाले नाहीत, तर हृदय थांबू शकतं. एखादी व्यक्ती दिसायला तंदुरुस्त असली तरी तिच्या शरीरात लपलेली ऍलर्जी किंवा सौम्य हृदयरोग असू शकतो, आणि अशा वेळी एक साधी कीटक चावही जीव धोक्यात आणू शकते.
अशा परिस्थितीत त्वरित ॲड्रेनालिन, स्टिरॉइड्स आणि ऑक्सिजन देणं हीच खरी जीवनरेखा ठरते. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास रुग्णाला बरे करणे कठीण होऊ शकते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.