Mental Health : सेलिब्रिटींच्या मुलांचा उपाचर करणाऱ्या डॉक्टरांकडून जाणून घ्या मानसिक आजारांवरचा योग्य उपचार

मुंबईचे प्रख्यात डॉक्टर निहार पारेख यांनी मुलांच्या मानसिक आरोग्यासंबंधित समस्यांना कसे समोरे जावे याबाबत सांगितले आहे.
Mental Health
Mental Healthesakal

Mental Health : मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या फक्त मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांनादेखील असू शकतात. कोरोनानंतर तर लोकांच्या मानसिक आरोग्यावर जास्तच परिणाम झाल्याचे दिसून येते. मुलांमध्ये अनेक बदल या काळात पालकांना दिसून आले. मुलांमध्ये चिडचिडेपणा, एन्झायटी, अटेंशन डिसॉर्डर यांसारख्या समस्या दिसून येतात. यावर मुंबईचे प्रख्यात डॉक्टर निहार पारेख यांनी मुलांच्या मानसिक आरोग्यासंबंधित समस्यांना कसे समोरे जावे याबाबत सांगितले आहे.

मानसिक आरोग्य जपणे का महत्वाचे ते आधी समजून घ्या

डॉक्टर म्हणतात, मोठ्यांप्रमाणे लहानांमध्येसुद्धा मानसिक आरोग्य जपणे फार महत्वाचे आहे. काही परिस्थितींमध्ये तुमच्या मुलांचे मानसिक आरोग्य बरोबर नसेल तर त्यात भूकेची कमतरता आढळून येते. शरीरात सकारात्मक हार्नोन्सच्या रिलीजच्या कमतरतेमुळे कमजोर इम्युनिटी, झोप न येणे अशा समस्या दिसून येतात.

पालकांनी हे संकेत समजून घ्यावे

मुलाच्या वागण्यात काही बदल दिसला की तो कमी-अधिक प्रमाणात झोपू लागतो, त्याला मित्रांची संगत अधिक आवडू लागते, तो लोकांपासून दूर राहू लागतो, तेव्हा पालकांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. लहान मुलांमध्ये राग येणे आणि ओरडणे, खूप खाणे किंवा अजिबात न खाणे आणि भावनिकदृष्ट्या कमकुवत होणे ही मानसिक आजाराची काही सुरुवातीची लक्षणे आहेत.

मुलांमध्ये मानसिक विकार

डॉक्टर निहार पारेख यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले की, सामाजिक चिंता विकारासोबतच नैराश्य आणि बायपोलर डिसऑर्डर सारखे मूड डिसऑर्डर देखील मुलांमध्ये दिसून येतात. तर एडीएचडी आजार मुलांचे लक्ष आणि वर्तन देखील प्रभावित करते. मुलांमध्ये खाण्याचे विकार देखील दिसून येतात आणि त्यात बालपणातील फोबिया आणि लहान वयात नैराश्य यांचा समावेश होतो.

Mental Health
Mental Health : मानसिक आरोग्याकडे भारतीयांचे दुर्लक्षच!

पालकांसाठीच्या काही टिप्स

डॉक्टर निहार पारेख म्हणाले की, एकदा पालकांनी डॉक्टरांवर विश्वास ठेवला की, डॉक्टर त्यांना मुलाच्या समस्यांबद्दल अधिक चांगले सांगू शकतात. मुलांच्या मानसिक समस्यांबाबत पालकांकडून या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आणि असे काही नाहीये हे सांगणे पालकांमध्ये सामान्यपणे दिसून येते आणि यामुळे मुलाचे नुकसान होते. डॉक्टर निहार म्हणाले की, मानसिक आरोग्याशी संबंधित विकारांवर मात करण्यासाठी मुलांना व्यावसायिक मदतीचीही गरज असते.

Mental Health
World Mental Health Day: 100 मागे 30 जण मानसिक आजारी; जिल्ह्यात वर्षभरात 20 हजार जणांवर मानसिक उपचार

या पद्धती पालकांसाठी उपयुक्त ठरतील

तुमचा मुलांसोबत असलेला बाँड मजबूत करण्यासाठी तुमच्या मुलासोबत दर्जेदार वेळ घालवा.

आत्मविश्वास आणि कौशल्य विकासासाठी मुलाच्या आवडी आणि छंदांना प्रोत्साहन द्या.

तुमच्या मुलाचा विचार करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com