Bread In Freeze : चहाला सोबती तुमचा आवडता ब्रेड तुम्हीही फ्रिजमध्ये ठेवताय का? ही चूक पडेल महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bread In Freeze

Bread In Freeze : चहाला सोबती तुमचा आवडता ब्रेड तुम्हीही फ्रिजमध्ये ठेवताय का? ही चूक पडेल महागात

Bread In Freeze : अनेकांना चहासोबत ब्रेड खायची सवय असते. मात्र ब्रेड दीर्घकाळ बाहेर ठेवले तर वास मारतो. म्हणून अनेकजण त्यास फ्रीजमध्ये ठेवतात. मात्र तुमच्या चहाला सोबती तुमचा आवडता ब्रेड फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचे काय दुष्परिणाम होतात हे तुम्हाला माहितीये काय? जाणून घ्या सविस्तर.

अनेकदा आपण ब्रेडसह इतर गोष्टीही दीर्घकाळ टिकाव्यात म्हणून फ्रीजमध्ये ठेवतो. फ्रीजमध्ये ठेवल्याने वस्तू दीर्घकाळ टीकून राहातात असे आपल्याला वाटते. मात्र ब्रेड फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची चव किंवा पोत खराब होते.

खरं तर ब्रेड फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. कारण ब्रेड नॉर्मल रूम टेंप्रेचरमध्ये ठेवता येईल अशात पद्धतीने बनवला जातो. त्यामुळेच जेव्हा तुम्ही ब्रेड विकत घेता तेव्हा तो तुम्हाला काऊंटरवर ठेवलेला दिसतो.

हेही वाचा: Instant Bread Receipe : ब्रेड उरला आहे? मग बनवा खास शाही तुकडा घरच्या घरी फक्त २० मिनिटांत

फ्रीजमध्ये ठेवण्याने कोणते नुकसान होते?

फ्रीजमध्ये ब्रेड ठेवल्याने त्याची सॉफ्टनेस कमी होते. कोणताही ब्रेड विकत घेताना त्यावर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. त्यामुळे ती तारीख बघूनच तो विकत घ्या. (Health News)

डिस्क्लेमर - वरील लेख केवळ माहितीसाठी असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

टॅग्स :breadhealth