
थोडक्यात:
केरळच्या कोझिकोडमध्ये ९ वर्षीय मुलीचा दुर्मिळ मेंदूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला असून अजून दोन जणांना बाधा झाली आहे.
हा आजार दूषित पाण्यात आढळणाऱ्या मुक्त अमीबांमुळे होतो आणि वैद्यकीय भाषेत त्याला अमीबिक एन्सेफेलायटिस म्हणतात.
संसर्ग झपाट्याने प्राणघातक ठरू शकतो, त्यामुळे वेळेत माहिती घेऊन आवश्यक काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
CDC Guidelines on Amoebic Encephalitis Prevention: केरळच्या कोझिकोड इथे दोन दिवसांपूर्वी एका ९ वर्षीय मुलीचा मेंदूच्या दुर्मिळ आजाराने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नव्हे, तर या संसर्गाने अजून दोन जणांना बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे, त्यापैकी एक केवळ तीन महिन्यांचं बाळ असल्याचं सांगितलं जात आहे.
डॉक्टरांच्या मते, हा आजार दूषित पाण्यात आढळणाऱ्या मुक्त अमीबांमुळे होतो. वैद्यकीय भाषेत याला अमीबिक एन्सेफेलायटिस असं म्हटलं जातं. हा संसर्ग अत्यंत वेगाने प्राणघातक ठरू शकतो, त्यामुळे जागरूक राहणं गरजेचं आहे.
चला तर मग, या आजाराबद्दल आणि त्यापासून वाचण्यासाठी कोणते उपाय करता येऊ शकतात ते जाणून घेऊया...