

Kidney Disease : डोकेदुखी ते सर्वच प्रकारच्या वेदनांपासून मुक्ती मिळावी यासाठी रुग्ण डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध दुकानांतून पेन किलर खरेदी करून त्याचा वापर करतात. कोरोना काळातही गरज नसताना स्टिरॉईडचा अमर्याद वापर झाला.
म्युकर मायकोसीसमुळे त्याचे आरोग्यावर दूरगामी परिणाम झाले. अशा परिस्थितीत पेनकिलर सोडून आयुर्वेदिक शास्त्रात वेदना दूर करणारी औषधी घ्यावी आणि पेनकिलरचा होणारा अमर्याद वापर बंद करावा, असे मत आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केले.