आजपासूनच किवी खा! रोगप्रतिकारशक्ती वाढवा, आजारांपासून राहा

kiwi
kiwi

सर्वांना माहित आहे किवी खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. आजकाच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण रोज स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही आणि वेळोवेळी फळे खात नाही. फळांमध्ये किवी खूप फायदेशीर आहे. शरीरातील व्हिटॅमीन सीची कमतरता पूर्ण करणअयासाठी रोज एक किवी खायला पाहिजे. त्यामुळे शरीराला कित्येक पोषक तत्व मिळतात. किवी हे फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. किवी हे फळ तुमची चरबी देखील कमी करते. हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी किवीचे सेवन करणे गरजेचे आहे. हे आरोग्य आणि चव दोन्हीच्याबाबतीत चांगले फळ आहे.


kiwi
kiwi canva esakal
kiwi
गर्भवती महिलांनो 'अशी' वाढवा रोगप्रतिकारशक्ती...सकस आहारासोबतच 'हे' सुद्धा महत्वाचेच!

कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवेल किवी

किवी असे फळ आहे जे संपुर्ण वर्षभर उपलब्ध असते. तुम्ही कोणत्याही सीजनमध्ये किवी खाऊ शकता. किवी खाण्यामुळे तुमची रोजप्रतिकारशक्ती चांगली होऊ शकते ज्यामुळे तुम्ही रोगांचा सामना करू शकता. कोरोनापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुम्ही किवीचे सेवन करू शकता. त्यामुळे किवीचा तुमच्या आहारामध्ये समावेश नक्की करा. किवीची चव देखील खूप चांगली असते.

kiwi
हिवाळ्यात आजारांपासून दूर राहायचेय? मग 'हे' सुपरफूड खा

रोज किवी खाण्याचे फायदे

किवी ह्रदयाच्या आरोग्यासाठी, बीपीची समस्या आणि डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. किवी खाण्यामुळे शरीराला खूप फायदे होतात. किवी खाल्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते आणि त्वचेवरील सुरुकुत्या कमी होतात त्याशिवाय पोटातील उष्णता आणि अल्सर सारखे आजार दूर करण्यासाठी देखील किवी खूप फायदेशीर मानले जाते. किवीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयरन आणि फॉलिक अॅसिड असते ज्यामुळे गर्भवती महिलांना खूप फायदा मिळतो.

रोज खा एक किवी

किवीमुळे सांधेदुखी, हाडांमधील दुखणे कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासोबत किवी मानसिक तनाव बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या हल्लाचा सामना करण्यासाठी फायदेशीर ठरते. किवी आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. किवीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असते. त्यामध्ये संत्र्याच्या दुप्पट प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. किवीमध्ये फायबर असते ज्यामुळे पाचनशक्ती वाढते त्यामध्ये पर्याप्त व्हिटॅमिन सी उपलब्ध असते, ज्यामुळे इम्युनिटी वाढविण्यासाठी मदत करते.तसेच थकवा घालविण्यासाठी देखील मदत करते. किवी इरेक्टाईल डिसफंक्शनसाठई देखील फायदेशीर ठरते, म्हणजेच याचा अर्थ ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि लैंगिक शक्तीसाठी खूप फायदेशीर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com