कशामुळे होतो Constipation चा त्रास जाणून घ्या बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपाय

बदललेल्या जीवनशैलीमुळे Lifestyle बद्धकोष्ठतेची समस्या दिवसेंदिवस वाढतेय. कारण मसालेदार पदार्थांचं अतिसेवन, जेवणाच्या अयोग्य वेळा, पुरेसं पाणी न पिणं तसचं कमी फायबरयुक्त आहार घेणं अशा काही कारणांमुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते
बद्धकोष्ठतेची समस्या
बद्धकोष्ठतेची समस्याEsakal

बद्धकोष्ठता Constipation ही अलिकडे एक सामान्य समस्या बनली आहे. मात्र अनेकदा बद्धकोष्ठतेचा त्रास कायम राहल्यास आरोग्याच्या Health इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. जेव्हा मल कोरडा पडतो आणि मल विसर्जनास समस्या निर्माण होतात. नियमितपणे मल विसर्जन होत नाही त्याला बद्धकोष्ठता असं म्हणतात. Know about Constipation and its Remedies at home

बदललेल्या जीवनशैलीमुळे Lifestyle बद्धकोष्ठतेची समस्या दिवसेंदिवस वाढतेय. कारण मसालेदार पदार्थांचं अतिसेवन, जेवणाच्या अयोग्य वेळा, पुरेसं पाणी न पिणं तसचं कमी फायबरयुक्त आहार घेणं अशा काही कारणांमुळे बद्धकोष्ठतेची Constipation समस्या निर्माण होते.

अनेकांना केवळ काही दिवसांसाठी बद्धकोष्ठतेचा त्रास होते. तर अनेकांना मात्र दिर्घकाळ बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्याने इतरही अनेक समस्या निर्माण होतात. बद्धकोष्ठतेची काही लक्षण पाहता त्यावर वेळीच उपचार आणि काही घरगुती उपाय करून यावर तोडगा काढणं शक्य आहे.

बद्धकोष्ठतेची लक्षणं Constipation Symptoms

पोटात सतत जडपणा जाणवणं किंवा पोट सतत फुगलेलं राहणं.

बद्धकोष्ठतेच्या समस्येमध्ये पोट नीट साफ न झाल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात.

मानसिकदृष्ट्या देखील अशा व्यक्ती सतत दडपणाखाली किंवा उदास राहतात.

श्वासातून दुर्गंधी येणं हे देखील बद्धकोष्ठतेचं प्रमुख लक्षण आहे.

सतत तोंड येणं

डोकेदुखी

भूक न लागणं ही काही बद्धकोष्ठतेची लक्षणं आहेत.

हे देखिल वाचा -

बद्धकोष्ठतेची समस्या
Yoga for Constipation: पोट साफ न होण्याच्या समस्येने आहात त्रस्त, मग या योगासनांमुळे होईल बद्धकोष्ठता दूर

बद्धकोष्ठतेची कारणं आणि उपाय

फायबरयुक्त आहाराची कमतरता- आहारात फायबरयुक्त पदार्थांचं सेवन कमी असल्यास बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होवू शकते. यासाठीच आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या तसचं फळांचं सेवन करणं गरजेंचं आहे.

दिवसभरामध्ये किमान एकातरी फळाचं सेवन करणं गरजेचं आहे. तर जेवणामध्ये फायबरयुक्त भाज्यांचा समावेश असावा. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या तर दूर होईलच शिवाय शरीराला इतर पोषक तत्वही मिळतील.

कमी पाणी पिणं- शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. कमी पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. यामुळे मल कठिण होतं आणि मल विसर्जनासाठी समस्या निर्माण होते.

पाणी कमी प्यायल्याने योग्य पचन होत नाही. तसचं शरीरात पाचक रस मिसळ्यास अडथळा निर्माण होतो. यासाठीत दिवसभरामध्ये किमान ८-१० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे.

मसालेदार पदार्थांचं सेवन- जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. तेलकट-तिखट पदार्थ खाल्ल्याने मलामध्ये फॅटही जोडले जातात. यामुळे मल कठिण होतं. परिणामी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.

इतर कारण- दिवसभर एकाच जागी बसून काम केल्याने शरीराची हालचाल होत नाही यामुळे देखील बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. तसचं झोपण्याच्या आणि जेवणाच्या अयोग्य वेळा हे देखील यामागचं एक महत्वाचं कारण आहे. यासोबत जास्त ताण आणि चिंता हे देखील एक कारण असू शकतं.

काही घरगुती उपायांच्या मदतीने ही समस्या दूर करणं शक्य आहे.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा. एक ग्लास कोमट पाण्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस मिसळून सेवन केल्यास पोट साफ होण्यास मदत होईल.

जेवल्यानंतर योग्य पचन होण्यासाठी बडीशेप आणि खडीसाखरेचं सेवन करावं.

दुपारी एक ग्लासभर पाण्यात १ चमचा अळशीच्या बिया भिजत ठेवा. रात्री जेवणानंतर १ तासाने या पाण्यासोबत बियाचं सेवन करा. अळशीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पोट साफ होण्यास मदत होईल.

आहारामध्ये गाजर, काकडी, बीट, तसचं सलाडचा समावेश करा.

अशा प्रकारे काही घरगुती उपाय तसचं योग्य आहारासोबत जीवनशैलीत योग्य बदल केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या सहज दूर करणं शक्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com