
Get Rid of Bugs Indoors: घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न ठेवायचं असेल तर घराची स्वच्छता करणं गरजेचं आहे. जर घरात अस्वच्छता आणि पसारा असेल तर सहाजिकच त्या ठिकाणी रोगराई पसरते. इतकंच नाही डास, ढेकूण यांचीही पैदास होते. अनेक वेळा उन्हाळ्यात घरामध्ये, घरांच्या कोपऱ्यात किंवा अंथरुणांवर ढेकूण आढळून येतात. दिसायला अत्यंत लहान असलेले हे ढेकूण खूप जोरात चावतात. त्यामुळे अनेकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो. परंतु, हे ढेकूण येतात नक्की कुठून? तर एका ठिकाणाहून, दुसऱ्या ठिकाणी... असा या ढेकणांचा प्रवास सुरु होतो. हॉटेलमध्ये राहायला वैगरे गेलात की हमखास हा ढेकूण आपल्या घरापर्यंत येतो. तो येऊ नये यासाठी अगदी थोडीशीच काळजी घ्या आणि काळजी घेण्याआधी थोडं वाचा..
हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने
ढेकूण नेमके कसे दिसतात
तर ढेकूण, ढेकूण असं म्हणण्याआधी ढेकूण दिसतो कसा हे माहीत असायला हवा. तर ढेकूण लहान, सपाट आणि अंडाकृती आकाराचा असतो. त्यांना सहा पाय आणि दोन अँटेना असतात. साधारणपणे ढेकणाचा आकार 5 ते 6 मिमी दरम्यान असतो. हॉटेलच्या खोलीत अशा प्रकारचा किडा आढळला की समजून जा तो ढेकूण आहे म्हणून.
गाद्यांवर किंवा पांघरुणात यांचा वावर
हॉटेलच्या खोलीत गेल्यानंतर लगेचच सामान अनपॅक करू नका. किंवा मग थेट बेडवर जाऊन लोळू नका. पहिल्यांदा ढेकूण गादीवर किंवा ब्लँकेटवर दिसतोय का ते तपासा. शक्य असल्यास, गाडी उचलून एकदा तपासा. कारण ढेकूण प्रत्येक कोपऱ्यात लपून बसलेले असतात.
सोफ्यावर, उशांवर एकदा नजर मारा
ढेकूण हॉटेलच्या खोलीतील सोफा, कुशन आणि उशांमध्ये लपून बसलेले असण्याची शक्यता असते. म्हणून, त्यांचा वापर करण्यापूर्वी, सोफ्यावरील कुशन काढून टाका आणि झाडून पाहा. सोफ्याच्या जॉइन्ट्समध्ये देखील काळजीपूर्वक पहावे लागेल.
कपाट आणि ड्रॉवर चेक करा
एवढंच नाही तर ढेकूण खोलीच्या कपाटात आणि ड्रॉवरमध्ये देखील लपून बसतात. हॉटेलमध्ये सहसा आपण कपाट वापरत नाही त्यामुळे आपलं तिकडे लक्ष जात नाही. त्यामुळे हॉटेलच्या खोलीतल्या कपाटात ढेकणांचा वावर असेल तर तो आपल्या बॅगेतून आपल्या घरापर्यंत येण्याची शक्यता आहे.
लॅम्पशेड्स आणि फ्रेम्समध्ये लपलेले ढेकूण
खोली तपासून झाल्यावर तिथले लॅम्पशेड्स, फ्रेम्स आणि पडदे देखील तपासा. तसेच घड्याळ आणि फोटो फ्रेम जवळून पहा. खोलीत पोहोचताच तुमचं सामान बेडवर ठेवू नका. कारण, हे ढेकूण तुमच्या सामानात हळूच नकळतपणे शिरू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.