COVID-19 : Omicron व्हेरिअटंचा सामना अँटीबॉडीज का करू शकत नाही?

Omicron COVID-19 Variant: कोरोनाव्हायरसच्या नवीन स्ट्रेन विरूद्ध अँटीबॉडीज का ठरतायेत अप्रभावी?
Know Why Antibodies Become Ineffective Against Omicron COVID-19 Varian
Know Why Antibodies Become Ineffective Against Omicron COVID-19 VarianE sakal

कोरोना विषाणूचा नवा व्हेरिटअंट ओमीक्रॉन हा जगातील सर्वात प्रबळ विषाणू बनला आहे. सर्वात पहिल्यांदा अफ्रिकेमध्ये आढळलेला नवीन विषाणू ओमीक्रॉन हा सर्वात जास्त सर्वात उत्परिवर्तित असून त्यात ५० पेक्षा जास्त बदल होत असून आणि ३० स्पाईक प्रोटीन आहे ज्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीमुळे मिळालेल्या रोगप्रतिकारशक्तीवरही तो मात करू शकतो. भारतातील लोकांनाही ओमीक्रॉनची लागण होत आहे.

२०२१ मध्ये कोराना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत झालेल्या आघातातून अजून देश सावरला नाही तोच दुसरा नवा व्हेरिटअंट आल्यामुळे अजूनही कोरोना विषाणू अस्तिवात आहे याची आठवण करून देत आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे हा विषाणू आधीच्या व्हेरिअंटपेक्षा अति संक्रमनशील आहे पण सौम्य आहे.

Know Why Antibodies Become Ineffective Against Omicron COVID-19 Varian
Winters Radish Benefits: हिवाळ्यात मुळा खाण्याचे 5 जबरदस्त फायदे

जर्नल ऑफ ऑटोइम्युनिटीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिअंट, ज्यात त्याच्या स्पाइक प्रोटीनवर 30 पेक्षा जास्त उत्परिवर्तनांचा समावेश आहे, त्याचा सामना करण्यासाठी अँटीबॉडीज कुचकामी ठरत आहे. विशेषत: ओमिक्रॉन स्ट्रेनच्या स्पाइक (एस) प्रथिनातील विलक्षण उत्परिवर्तन त्याच्या अति संक्रामकतेशी आणि संसर्गजन्यता सबंधित आहे. हे बदल मानवी शरीरात पूर्व-अस्तित्वात असलेल्या अँटीबॉडीजचा प्रतिकार करण्यास सक्षम करतात, ज्यामुळे पुन्हा-संक्रमण वाढ होते.

मिसूरी विद्यापीठाच्या संशोधकांना ओमिक्रॉन व्हेरिअंट iS-प्रोटीनमध्ये आढळलेल्या बदलांबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते. अभ्यासात ओमिक्रॉन व्हेरिअंट संपूर्ण अनुक्रम वापरून 46 हॉलमार्क बदल आढळले, त्यापैकी 23 पूर्णपणे नवीन होते आणि व्हायरसच्या मागील कोणत्याही व्हेरिअंटमध्ये हे बदल आढळले नव्हते. डेल्टा किंवा डेल्टा प्लस व्हेरिअंटमध्ये दोन उत्परिवर्तन प्रथम आढळले होतेय 46 पैकी तीस बदल एस-प्रोटीनमध्ये आढळले, तर बाकीचे इतरत्र विषाणूच्या पेशीमध्ये आढळले. शिवाय, संशोधकांनी पूर्व-अस्तित्वात असलेली एस-प्रोटीन रचना वापरून पाहिली की, ओमिक्रॉन उत्परिवर्तनांमुळे कोविड-19 एस-प्रोटीनला त्याच प्रकारे नुकसान होईल का, अॅन्टीबॉडीज् अप्रभावी ठरतील.

Know Why Antibodies Become Ineffective Against Omicron COVID-19 Varian
डाळींब- पोषक तत्वांचा खजिना; रक्तदाब नियंत्रणासह अनेक फायदे

काही उत्परिवर्तन Omicronविरुद्ध संरक्षण प्रभावित करू शकतात

रिसर्चनुसार, काही उत्परिवर्तनांमुळे विषाणूच्या पृष्ठभागावर हस्तक्षेप करतात, अॅन्टबॉडीजना चिकटून राहण्यापासून प्रतिबंधित करतात, तर इतरांमुळे अॅन्टीबॉडीज आणि विषाणू यांच्यातील परस्परसंवाद पूर्णपणे नष्ट होतो, ज्यामुळे अॅन्टीबॉडीज, अत्यंत सुधारित व्हेरिअंटविरूद्ध निरुपयोगी ठरतात. संशोधकांच्या मते यावरून स्पष्ट होते की, आधीच अस्तित्वात असलेली प्रतिकारशक्ती (लसीकरण किंवा मागील संसर्गामुळे) यापुढे विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटपासून पुरेसे संरक्षण देऊ शकत नाही, ज्यामुळे ते व्हेरिअंट अँटीबॉडीज टाळू शकतात आणि रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये प्रवेश करू शकतात.

युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ व्हेटेरिनरी मेडिसिनचे प्राध्यापक कमलेंद्र सिंग म्हणाले, "अँटीबॉडीजचा उद्देश व्हायरस ओळखणे आणि बंधने थांबवणे हा आहे, ज्यामुळे संक्रमणास प्रतिबंध होतो."

परंतू, आम्‍हाला आढळले की,'' ओमिक्रॉन व्हेरिअंटमधील अनेक उत्परिवर्तन ज्‍या ठिकाणी अँटीबॉडीज बांधून ठेवण्‍याची अपेक्षा आहे त्‍या ठिकाणी आहेत, म्‍हणून व्हायरस कशा प्रकारे उत्क्रांत होत राहतो की तो विद्यमान अॅन्टीबॉडीजपासून स्वत:चा बचाव करू शकतो किंवा टाळू शकतो आणि बर्‍याच लोकांना संक्रमित करू शकतो, हे आम्ही दाखवित आहोत,” असे ते पुढे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com