Vitamin Bच्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती होऊ शकते कमी; जाणून घ्या काय खावे | Vitamin B Deficiency | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vitamin Bच्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती होऊ शकते कमी; जाणून घ्या काय खावे

Vitamin Bच्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती होऊ शकते कमी; जाणून घ्या काय खावे

Vitamin B rich foods : शरीर निरोगी ठेवण्यासाठी कोणत्याही 'व्हिटॅमिन बी'ची कमतरता होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 'व्हिटॅमिन बी'चे वेगवेगळे प्रकार असतात, ज्यांच्या कमतरतेमुळे वेगवेगळे शारिरीक लक्षण दिसून येतात. 'व्हिटॅमिन बी'च्या कमतरतेमुळे काय काय रोग होतात आणि 'व्हिटॅमिन बी'चे किती प्रकार असतात जाणून घेऊ या.....

व्हिटॅमिन बी चे प्रकार: 'व्हिटॅमिन बी'चे किती प्रकार आहेत?

NHSच्या मते, 'व्हिटॅमिन बी'चे प्रामुख्याने 8 प्रकार आहेत. सर्व प्रकारच्या 'व्हिटॅमिन बी'च्या गटाला बी-कॉम्प्लेक्स म्हणतात. जसे-

  • व्हिटॅमिन बी 1 (थायमिन)

  • व्हिटॅमिन बी 2 (रिबोफ्लेविन)

  • व्हिटॅमिन बी 3 (नियासिन)

  • व्हिटॅमिन बी 5 (पॅन्टोथेनिक ऍसिड)

  • व्हिटॅमिन बी 6

  • व्हिटॅमिन बी7 (बायोटिन)

  • व्हिटॅमिन बी 9 (फोलेट किंवा फॉलिक ऍसिड)

  • व्हिटॅमिन बी 12

हेही वाचा: कोरोनातून बरे झालेल्यांना होतोय ब्रेन फॉग, काय आहेत लक्षणे?

Vitamin B Deficiency: 'व्हिटॅमिन बी'च्या कमतरतेमुळे कोण-कोणते आजार होतात?

हेल्थलाईननुसार, काही प्रकाराची व्हिटॅमिनच्या कमतरमुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. जसे की

शरीरामध्ये व्हिटॅमिन बी 1 आणि व्हिटॅमिन बी 2 च्या कमतरतेचे लक्षण

या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे नर्व्हस सिस्टिम, स्किन, डोळे इ. प्रभाव पडतो. ज्यामुळे शरीरामध्ये अशक्तपणा येऊ शकतो आणि तोंड येऊ शकते.

व्हिटॅमिन बी1 आणि व्हिटॅमिन बी2 भरपूर प्रमाणात असलेले पदार्थ :

पूर्ण धान्य, मासे, सुका मेवा आणि बिया, अंडी, ब्रोकली आणि पालकसारख्या हिरव्या भाज्या, लो फॅट मिल्क इ.

हेही वाचा: स्लीम दिसायचंय? मग 'ही' ऐतिहासिक भाजी आहारात नक्की घ्या...

व्हिटॅमिन बी3 च्या कमतरतेचे लक्षण

उलटी, थकवा, भास, बद्धकोष्ठता आणि अतिसार, जिभेचा लाल रंग, उग्र त्वचा आणि तिचा लाल आणि तपकिरी रंग, अपचन, मळमळ, पोटात गोळे येणे इ.

व्हिटॅमिन बी3 चे भरपूर प्रमाण असेलले पदार्थ:

पीनट सॉस, मीट, मासे इ.

शरीरामध्ये व्हिटॅमिन बी9( फोलेट) च्या कमतरतेमुळे होणारे रोग

थकवा, लक्ष केंद्रीत न होणे, चिडचिडापण, ह्रदयाचे ठोके वाढणे, घाबरल्यासारखे होणे, धाप लागणे, मेगालोब्लास्टिक अॅनिमिया, स्किन-केस-नखांच्या रंग बदलणे इ.

व्हिटॅमिन बी 9 चे भरपूर प्रमाण असेलले पदार्थ:

हिरव्या पालेभाज्या जसे की मोहरी आणि पालक, संत्री, शेंगदाणे, राजमा, वाटाणे इ.

हेही वाचा: लसीकरणानंतर मासिक पाळी थोडी उशीरा येऊ शकते: संशोधनाचा निष्कर्ष

शरीरामध्ये व्हिटॅमिन बी 6 च्या कमतरतेचे लक्षण :

नैराश्य, गोंधळणे, मळमळणे, अॅनिमिया, वारं वार इन्फेक्शन होणे, स्किन रॅशेज किंवा डरमाटाईटिस इ.

व्हिटॅमिन बी 6 चे भरपूर प्रमाण असेलले पदार्थ :

बटाटा आणि स्टार्ची भाज्याा, आंबट किंवा इतर फळे, मासे इ.

शरीरामध्ये व्हिटॅमिन बी 12 कमतरतेमुळे होणारे आजार

थकवा, अशक्तपणा, बद्धकोष्ठता, भूक न लागणे, अचानक वजन कमी होणे, हाथ-पाय सुन्न होणे, स्मरणशक्ती कमी होणे, तोंड किंवा जीभेला सूज येणे

व्हिटॅमिन बी 12 चे भरपूर प्रमाण असेलले पदार्थ :

अंडे, प्लांट मिल्क, दूध, चीज, मासे, चिकन इ.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :vitamin B12
loading image
go to top