Diabetes Patient Health Care: ही पाच हिरवी पानं करतील ब्लड शुगर कंट्रोल; यात आहे नॅचरल इन्सुलीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diabetes Patient Health Care

Diabetes Patient Health Care: ही पाच हिरवी पानं करतील ब्लड शुगर कंट्रोल; यात आहे नॅचरल इन्सुलीन

Health Care: मधूमेह रूग्णांच्या शरीराला आतून कमकुवत करते. हा आजार एकदा ज्याला होतो मग आयुष्यभर त्यातून सुटका नसते असेच मानले जाते. मधूमेहाच्या रूग्णांनी त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यास त्यांना हृदयविकार आणि किडनीचे आजार उद्भवू शकतात. ही वेळ येऊच नये यासाठी तुम्ही काही नैसर्गिक उपाय करायलाच हवे. आज आपण मधूमेहाच्या रूग्णांसाठी जाणून घेऊया नैसर्गिक उपाय.

हेही वाचा: Health: हिवाळ्यात वजनाच्या समस्येपासून त्रस्त आहात? फॉलो करा 'या' टिप्स

अश्वगंधाची पान शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतात. अश्वगंधाच्या पानांना उन्हात सुकवा आणि त्याचं पावडर बनवून कोमट पाण्यात मिसळून प्या. मधूमेहाच्या रूग्णांसाठी हा उपाय रामबाण ठरू शकतो. (Health)

ashwagandha leaves

ashwagandha leaves

दक्षिण भारतात खाण्याच्या बहुतांश पदार्थांमध्ये कळीपत्त्याचा वापर केला जातो. मात्र कळीपत्त्याची ही पानं मधूमेहाच्या रूग्णांसाठी किती लाभदायक आहे हे तुम्हाला माहिती आहे काय?

kari patta

kari patta

मेथीची पानं देखील आयुर्वेदिक गुणांनी भरपूर असते. त्यामुळे या पानांचं सेवन देखील शरीरासाठी लाभदायक ठरते. याची पानं किंवा बिया शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते.

methi leaves

methi leaves

आंब्याच्या फळाला मधूमेहाच्या रूग्णांचा शत्रू मानल्या जातं. कारण यात नॅचरल शुगर इंग्रेडियंट फार जास्त प्रमाणात असतात. मात्र याच आंब्याच्या झाडाची पानं मधूमेहाच्या रूग्णांसाठी फार लाभदायक आहे. यात फायबर आणि विटामिन असते. यात कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्याचीही क्षमता असते. आंब्याची पानं उकळवून घ्या आणि त्याचे पाणी गाळून प्या. याने मधूमेहाच्या रूग्णांना फायदा होईल.

mango leaves

mango leaves

ऑरगॅनोची पानं देखील मधूमेहाच्या रूग्णांसाठी लाभदायक आहे. ही पानं तुमची गोड खाण्याची इच्छा शक्ती कमी करते. तसेच तुमची इम्युनिटी बूस्ट करते.