
Heart Health To Be Tracked By App: हृदयाशी संबंधित आजार आणि शस्त्रक्रियेनंतर आरोग्याची काळजी घेणे रुग्णांसाठी मोठे आव्हान असते. आता ॲपच्या माध्यमातून ही समस्या सहज सोडवली जाऊ शकते. ‘लाइफ ॲप’च्या मदतीने रुग्णांना हृदयाची काळजी कशी घ्यावी, हे कळू शकणार आहे.
केवळ रुग्णच नाही तर त्याची काळजी घेणारे लोक दूर असतानाही ॲपच्या माध्यमातून रुग्णाची स्थिती जाणून घेऊ शकतील. ॲपच्या माध्यमातून हृदयरोगतज्ज्ञांशी हृदयाशी संपर्क साधता येऊ शकतो. सध्या ८५० हृदयरोगतज्ज्ञ या ॲपशी जोडले गेले आहेत.