जीवनमान-जीवनभान : नात्यांचं ‘सॉफ्टवेअर अपडेट’

जुनी कारणं पूर्ण झाली, पण नातं का अडकलंय? स्व-जागरूकता, संवाद आणि पुनर्रचनेतून वैवाहिक नात्याला नवा अर्थ देण्याचा प्रयत्न
Relationship Evolution: Lifestyle Coach Devayani M. Advocates Emotional Upgrades

Relationship Evolution: Lifestyle Coach Devayani M. Advocates Emotional Upgrades

Sakal

Updated on

देवयानी एम., लाइफस्टाइल कोच

काही दिवसांपूर्वी रात्री उशिरा मोबाईल वाजला. स्क्रीनवर माझ्या एका जुन्या मैत्रिणीचं नाव होतं. फोन उचलला तर पलीकडून फक्त हुंदके ऐकू येत होते. ती प्रचंड मानसिक तणावात होती, तिला तिचं मन मोकळं करायचं होतं. नवऱ्यासोबत झालेल्या कुठल्यातरी वादामुळे ती अस्वस्थ होती. मी त्या दोघांनाही गेली अनेक वर्षं ओळखत असल्यामुळे, त्यांच्यातले मतभेद आणि त्यामागची कारणं मला ठाऊक होती. तिचा सगळा राग, तिचा सगळा संताप मी शांतपणे ऐकून घेतला. ती थोडी शांत झाली, तेव्हा मी तिला एक साधाच प्रश्न विचारला, ‘‘तू त्याच्याशी लग्न का केलंस? काय कारण होतं त्यामागे?’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com